शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:53 IST

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे.

पंढरपूर :

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनाठा ते पंढरपूर अशी दिंडी मागील २५ वर्षापासून येते. या दिंडीत भाविक नादेंड व हिंगोली जिल्ह्यातील लोक १८५ च्या आसपास पायी चालत येतात. यंदा माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी दिंडी ३१ जानेवारी रोजी पंढरपुरात आले. त्यांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. त्या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर अन् आमटी खाली. परंतु त्यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाला. ही माहिती मिळताच त्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका पोहचली.  

बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे. ही माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कूचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाने  विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे.उपजिल्हा रुग्णालय १३७ भाविक उपचार घेत आहेत. सर्व भाविकांची प्रकृती स्थिर आहे. - महेशकुमार माने, वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर

टॅग्स :Pandharpurपंढरपूर