शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पंचशील ग्रुपच्या अजय चोरडियांनी केली आत्महत्या

By admin | Updated: October 28, 2014 02:28 IST

पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया (48) यांनी चिंचवड येथील स्वत:च्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी : पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया (48) यांनी चिंचवड येथील स्वत:च्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. डबल ट्री हिल्टन हॉटेलमध्ये हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आला. प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक ईश्वरदास  चोरडिया यांचे ते सुपुत्र आणि उद्योगपती अतुल चोरडिया 
यांचे ते बंधू होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये राहणा:या चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपचे चिंचवड स्टेशन येथे डबल ट्री हिल्टन हे पंचतारांकित हॉटेल आहे. हॉटेलच्या बाराव्या मजल्यावर अजय यांचे कार्यालय आहे. कुटुंबातील व्यक्तींना भेटून ते दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉटेलमध्ये आले. त्यानंतर दीडच्या सुमारास अजय यांनी  कार्यालयाबाहेरील पॅसेजमध्ये असणा:या फायर सिस्टिम पाईपला पडद्यासाठी सॅम्पल म्हणून आलेल्या कापडाची दोरी तयार केली व तिच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कर्मचा:यांनी लगेचच त्यांना जवळच्या निरामय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच अजय यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले.
या घटनेची माहिती कळताच थोरले बंधू अतुल यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तोर्पयत अजयचे जवळचे मित्र निवृत्त सनदी अधिकारी दिलीप बंड, अनिल डिग्गीकर आदी दाखल झाले. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अजय यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. 
बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात चोरडिया कुटुंबाचा लौकीक आहे. पुण्यातील मॅरियट, ऑर्चिड, हिल्टन अशी पंचतारांकित हॉटेलची त्यांची साखळी आहे. अजय यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून बीकॉम पूर्ण केले होते.  त्यांच्या मागे वडील ईश्वरदास, आई निर्मला, भाऊ अतुल, सागर, पत्नी मोनिका, मुलगा प्रतीक आणि मुलगी प्रियंका असा परिवार आहे. मुलगी व बहिण लंडनला आहे. त्यांना घटनेची माहिती कळविली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अजय यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत.
शरद पवार, अजित  पवारांकडून सांत्वन 
ईश्वरदास हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजय यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच सायंकाळी शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीवरून चोरडिया कुटुंबाचे सांत्वन केले. 
चांगला मित्र गमावला - कोठारी
अजय हे खूप सुस्वभावी व मनमिळावू होते. गेल्या आठवडय़ातच माझा त्यांच्याशी संवाद झाला होता. त्यांना हॉटेल इंडस्ट्री वाढवायची होती. त्यांच्या निधनाने हॉटेल व्यवसायातील एक चांगला मित्र मी गमावला, अशा शब्दांत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे पदाधिकारी व मध्य प्रदेश कमिटीचे चेअरमन सुनीत कोठारी यांनी शोक व्यक्त  केला आहे.
 
गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरार्पयत सुरू 
घटना दुपारी दीडला उघडकीस आली. मात्र, पिंपरी पोलिसांना दुपारी तीन वाजता याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहाचेले तोर्पयत अजय यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. पोस्टमोर्टेम झाल्यानंतरही उपायुक्तांनी या घटनेची माहिती दिली नाही. रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.