शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:03 IST

Newborn Dies In Mokhada: पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका सेवा नाकारण्यात आल्यामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मोखाडा: मृत अर्भकाला पिशवीत ठेवून त्याच्या पित्याने एसटीने गावापर्यंत प्रवास केला तेव्हा त्याच्यासोबत त्या अर्भकाची गंभीर आजारी माता अविता कवर हीसुद्धा होती, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, तिला रुग्णालयाने रुग्णवाहिकेबाबत  विचारले असता तिने सेवा नाकारली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. 

या प्रकाराची माहिती मिळताच माजी आ. सुनील भुसारा यांनी तत्काळ कवर कुटुंबीयांचे घर गाठले आणि अविता कवर यांची अवस्था पाहून त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले. अविता कवर या महिलेला प्रसूतीसाठी प्रथम खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत, त्यानंतर मोखाडा आणि तेथून नाशिक असा प्रवास करावा लागला. सरकारी आरोग्य यंत्रणेकडून रुग्णवाहिकाही मिळू शकली नाही. यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त होत आहे. 

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नाही. प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हे आरोग्य केंद्र कसेबसे चालवले जाते. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मंजूर पाचपैकी सर्वच्या सर्व वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. यामुळे एकीकडे पालघर जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवा सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला तरी येथे वारंवार होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रकार थांबविण्यात यश आलेले नाही, हेच या ताज्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

जबाबदारीही झटकली...अविता कवर यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असताना आरोग्य यंत्रणेने तशी तसदी घेतलेली नाही. पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांनी, मृत अर्भकासाठी शववाहिका देण्याची जबाबदारी नाशिक जिल्हा रुग्णालयाची असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.   

नागरिक नाराजही घटना प्रसिद्ध झाली त्यादिवशी आ. हरिश्चंद्र भोये मोखाडा पंचायत समितीत बैठक घेत होते. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेण्याचे औदार्य दाखवले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीचे आदेशहे प्रकरण गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी अहवाल येणार आहे. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्र