शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:55 AM

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- हितेन नाईकपालघर  - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत होणार आहे.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी, तसेच ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.२०९७ केंद्रांपैकी १४ केंद्रे संवेदनशील असून, या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात ३२७, विक्रमगडमध्ये ३२८, पालघरमध्ये ३१८, बोईसरमध्ये ३३८, नालासोपारामध्ये ४४९ तर वसई विधानसभा क्षेत्रात ३२७ मतदान केंद्रे आहेत. यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (६३), बोईसरमधील बोईसर (३४), धोंडीपूजा (८५), खैरपडा (२९४), तसेच वळीवमधील तीन केंद्रे, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण १४ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, १८२ पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार ६०२ पोलीस शिपाई, ४९५ नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार ११७ होमगार्ड व ४६ नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक यांना तैनात करण्यात आले आहे. मतदानासाठी २ हजार ७३७ मतदान केंद्र अध्यक्ष, ७ हजार ७३७ मतदान अधिकारी व २ हजार ३०८ शिपाई यांचा फौजफाटा असणार आहे.भंडारा-गोंदियात आघाडी आणि भाजपात मुख्य लढतभंडारा-गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. येथे भाजपाचे हेमंत पटले व आघाडीचे मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र