शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:13 IST

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये.

ठाणे: शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी तब्बल 29 हजार मतांनी विजय मिळवला. यानंतर आता शिवसेनेने मतांची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मतदानाच्या दिवसापासूनच शिवसेनेसह विरोधी पक्ष याठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख केतन पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. 20,21, 22, 23 आणि 24 व्या फेरीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि आमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. 20,21, 22, 23 आणि 24 फेरीतील मतांची पुन्हा मोजणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. 

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र, वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे