पालघर : पालघर या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता 57 गट, तर 114 गण आज पालघरच्या लायन्स क्लब सभागृहात जाहीर करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई या आठ तालुक्यांतील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. (वार्ताहर)
पालघर तालुक्यात जिल्हा परिषद गटात तारापूर, दांडी, पास्थळ, बोईसर, वंजारवाडा (बोईसर), सरावली, खैरापाडा, मान, ब:हाणपूर, कोंढाण, दहिसरतर्फे मनोर, खडकोली-वसरे, सातपाटी, शिरगाव, मायखोप, विराधन बुद्रुक, नवघर-घाटीम असे एकूण 17 गट व पालघर पंचायत समितीच्या गणांत तारापूर, कुरागव, दांडी, नवापूर, सालवड, पास्थळ, काटकरपाडा (बोईसर), बोईसर, बोईसर वंजारपाडा, दांडीपाडा (बोईसर), सरावली अवधनगर, सरावली, उमरोळी, खैरापाडा, मान, शिगाव, खुताडपाडा, ब:हाणपूर, टेण, कोंढाण, मनोर, दहिसरतर्फे मनोर, सावरे ऐबूर, धुकटण, खडकोली-वसेर, मुरबे, सातपाटी, शिरगाव, माहीम, मायखोप-केळवा, एडवण, विराधन बुद्रुक, सफाळे, नवघर-घाटीम असे एकूण 34 गण पाडण्यात आले आहेत.
वसई तालुक्यात जिल्हा परिषदेचे भाताणो, तिल्हेर, अर्नाळा किल्ला, कळंब असे चार गट, तर वसई पंचायत समितीचे भाताणो, सकवार, तिल्हेर, चंद्रपाडा, अर्नाळा किल्ला, अर्नाळा, कळंब, वसळई असे आठ गण पाडण्यात आले आहेत.
वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे गारगाव, मोज, वाडा, मांडा, पालसई, कुडूस व पंचायत समितीचे गारगाव, डाहे, मोज, खुपरी, वाडा, सापने बुद्रुक, गालतरे, मांडा, पालसई, केलढण, चिंचघर, कुडूस असे 12 गण पाडण्यात आले आहेत.
मोखाडा तालुक्यात जि.प.च्या गटात मो:हांडा, सातुर्ली, खोडाळा असे तीन गट तर पंचायत समिती गणात आसे, मो:हांडा, मोखाडा, सातुर्ली, खोडाळा, सायदे असे गण पाडण्यात आले आहेत.
जव्हार तालुक्यात जि.प.चे वावर वांगणी, हिरडपाडा, न्याहळे बुद्रूक, कोरतड, पाथर्डी हे पाच गट तर पं. समितीच्या गणांत साखरशेत, वावरवांगणी, सारसून, हिरडपाडा, न्याहळे बुद्रुक, कोलाळे, कोरतड, पिंपळशेत, कासटवाडी, पाथर्डी असे 1क् गण पाडण्यात आले आहेत.
विक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषद गटांमध्ये वेहेलपाडा, उटावली, दादडे, कुर्झे, आलोंडे, असे पाच गट तर पंचायत समिती गणामध्ये वेहेळपाडा, तलवाडा, जांभा, उटावली, विक्रमगड, दादेड, करसुंड, कुर्झे, चिंचघर, आलोंडे अशा 1क् गणांचा समावेश आहे.
डहाणू जि.प. गटात बोर्डी, आंबेसरी, मोडगाव, सायवन, विवळवेढे, मुरबाड, गंजाड, कैनाड, डेहणो, आसनगाव, वाणगाव, रणकोळ, असे 12 गट तर पंचायत समितीचे बोर्डी, अस्वाली, धामणगाव, आंबेसरी, हळदपाडा, मोडगाव, सायवन, चळणी, ओसरवीरा, विवळवेढे, कासा, मुरबाड, गंजाड, जामशेत, कैनाड, चिखले, सरावली, डेहणो, आसनगाव, धाकटी डहाणू, वाणगाव, चिंचणी, वनई, रणकोळ असे 24 गण पाडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पालघर जिल्हापरिषदेच्या 57 जागाचे आरक्षण आज जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जाहीर केले. यामध्येा अनुसूचित जमातीसाठी 36 जागा, अनुसूचित जातीसाठी एक जागा, मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी 15 जागा आणि सर्वसाधारण जागेसाठी 5 जागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पालघर जिलच्या निर्मितीनंतर पालघर जिल्हापरिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज पालघर जिलतील आठ तालुक्यातील आरक्षण लायन्स क्लब सभागृहात जिल्हाधिकारी बांगर, उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड व तहसिलदार सुरेंद्र नवले यांच्या उपस्थितीत पार पडला.
4तलासरी जिल्हापरिषद गटासाठीच्या उपलाटसाठी अनुसूचीत जमाती स्त्रियासाठी राखीव, तलासरीसाठी अनुसूचित जमाती, सभागटासाठी अनुसूचीत जमाती स्त्रि, वसा गटासाठी, अनुसूचित जमाती स्त्री, कुर्झे गटासाठी अनुसूचीत जमाती स्त्रियासाठी आरक्षण जाहीर
4डहाणू गटामध्ये बोर्डी गटासाठी अनुसूचित जमाती, आंबेसरीगटासाठी अनुसूचीत जमाती स्त्री, मोडगाव गटासाठी अनुसूचीत जमाती, सायवन गटासाठी अनुसूचीत जमाती स्त्री, विव्हळवेढे गटासाठी अनुसूचीत जमाती स्त्री, मुरबाड गटासाठी अनुसूचीत जमाती, गंजाडगट अनुसूचीत जमाती कैनाड गट अनुसूचीत जमाती स्त्री, डेहणो गट अनुसूचीत जमाती स्त्री आसनगाव गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, वाणगाव गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, रणकोळ गट अनुसूचीत जमाती स्त्री
4विक्रमगड गटामध्ये वेहेलपाडा गट अनुसूीचत जमाती स्त्री, उटावली गट अनुसूचीत जमाती स्त्री, दादडे गट अनुसूचीत जमाती स्त्रि, कुर्झे गट अनुसूचीत जमाती स्त्री, आलोंडे गट अनुसूचीत जमाती स्त्री
4जव्हार गटामध्ये वावर वांगणी गटासाठी अनुसूचीत जमाती, हिरडपाडा गट अनुसूचीत जमाती स्त्री, न्याहाळे बुद्रूक गट अनुसूचीत जमाती कोरतड गट अनुसूचीत जमाती, पाथर्डी गट अनुसूचीत जमाती स्त्री
4पालघर गटामध्ये तारापुर गट सर्वसाधारण स्त्री, नवापुर गट नागरीकांचा मागास प्रवर्ग, पास्थळ गट अनुसूचीत जाती स्त्री, बोईसर गट नागरीकांचा मागार्स प्रवर्ग, बोईसर (वंजारवाडा) गट नागरीकांच्या मागास प्रवर्ग स्त्री, सरावली गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, खैरापाडा गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, मानगट अनुसूचीत जमाती, ब:हाणपुर गट अनुसूचीत जमाती, कोंढाण गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, दहीसर तर्फे मनोर गट, अनुसूचीत जमाती, खडकोळी वसरे गट अनुसूचीत जमाती, सातपाटी गट नागरीकांचा मागास प्रवर्ग, शिरगाव गट सर्वसाधारण, नवघर घाटीम गट सर्वसाधारण
4मोखाडा गटामध्ये मो:हांडा गटात अनुसूचीत जमाती स्त्री, सातुर्ली गट अनुसूचीत जमाती, सावदे गट अनुसुचीत जमाती
4वाडा गटामध्ये डाहे गटास अनुसूचीत जमाती, मोजगट अनुसूचीत जमाती, वाडा गट नगारीकांचा मागास प्रवर्ग, मांडा गट अनुसूचीत जमाती, पालसई गट अनुसूचीत जमाती, कुडूस गट नागरीकांचा मागासप्रवर्ग स्त्री
4वसई गटासाठी भाताणो गट नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, तिल्हेर गट, सर्वसाधारण स्त्री, अर्नाळा किल्ला नागरीकांचा मागास प्रवर्ग, कळंब गट नागरीकांचा मागास प्रवर्ग इ. 57 गटासाठीच्या गावातील आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली.