शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. श्रीराम लागू यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 23:02 IST

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुंबई - आपल्या प्रभावी अभिनयाने दीर्घकाळ नाट्य आणि चित्रपट क्षेत्र गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज निधन झाले. डॉ. लागू यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्सृष्टीवर दु:खाचे सावट पसरले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारा  कलाकार हरपला  मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. - सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री

डॉ. लागू  म्हणजे अभिनय जगतातील 'सिंहासन'

गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे. डॉ. लागू हे अभिनय जगतातील 'सिंहासन' होते. या 'कलेच्या चंद्रा'ने 'सामना', 'पिंजरा' असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.  अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

एका नटसम्राटाची एक्झिट   नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली असल्याची शोकभावना  माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.  आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ श्रीराम लागु यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ लागुंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले .. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. - आ. सुधीर मुनगंटीवार चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - बाळासाहेब थोरात 

 

श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो

जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - जयंत पाटील 

 

 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूMaharashtraमहाराष्ट्र