शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra winter session 2021 : 'पडळकर म्हणाले, घाल रे त्याच्या अंगावर गाडी', नऊ जणांची साक्ष; गृहराज्यमंत्री देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:18 IST

Maharashtra winter session 2021 : पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले.  

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आपल्या राजकीय विरोधकांवर चक्क गाडी घालायला लावली. ‘घाल रे त्यांच्या अंगावर गाडी’, असे पडळकर म्हणाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. नऊ जणांनी तशी साक्ष दिल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. 

पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले.  कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देसाई यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.

पडळकर यांच्यावर हल्ला झाला, डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यांच्यावर हल्ला झाला हे खरे आहे. पण त्याच्या आधी पडळकर यांनी विरोधकांच्या अंगावर गाडी घालायला लावली. पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद आणि सहकाऱ्यांनी विरोधकांना धमकावल्याचे रेकाॅर्ड मिळाले आहेत. पडळकर यांनी विरोधकावर गाडी घालायला लावल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून जमाव जमला. घटनास्थळी असलेला डंपर हल्ल्यासाठीचा नसून रस्त्यावरून जाणारा होता, असे देसाई यांनी सांगितले.

आरोपांचा पाढागोपीचंद पडळकर यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न वगैरे सारखे १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत देसाई यांनी ती यादीच सभागृहात वाचून दाखविली. भडक भाषा बोलणारे, गंभीर गुन्हे असलेले पडळकर मात्र सांगली, पुणे, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी करीत असतात. हा सारा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असा आहे, असेही देसाई म्हणाले. 

देवस्थानच्या जमिनी हडपल्याची चौकशीज्या आटपाडीत हे गुन्हे नोंद आहेत. तिथे देवस्थानच्या जमिनी हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या संबंधितांचे नाव घेणार नाही. पण बोगस माणसे आणि खातेदार उभे करून जमिनी लाटल्या जात आहेत. या बोगस जमीन व्यवहारांची छाननी सुरू आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे ते वर्ग करून पुढील तपास करू, असेही देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरvidhan sabhaविधानसभा