शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Video: निष्पाप मनाचा धनी... उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू, व्हिडिओ पाहताच पंकजा मुंडेही भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 08:41 IST

उदयनराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करताना भावनिक कॅप्शन दिलंय.

मुंबई - भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्यातील भावूक आणि प्रेमळ व्यक्तीचेही दर्शन घडते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवसानिमित्त चक्क तोंडाने पेढा भरवला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता, उदयनराजेंनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उदयनराजेंनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच त्यांचे दर्शन घेतले. तसेच, काही क्षण ते भावूक झाल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर आता पंकजा मुंडेंनीही भावूक प्रतिक्रिया दिली. 

उदयनराजेंनी ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करताना भावनिक कॅप्शन दिलंय. तसेच, त्यांचा भावूक चेहराही व्हिडिओत दिसून येतो. संघर्षयोद्धा... 'द्वितीय आधारस्तंभ' असा शब्दात उदयनराजेंनी गोपीनाथ मुंडेंचं वर्ण केलं आहे. 'अद्वितीय आधारस्तंभ आदरणीय मुंडे साहेबांच्या आठवणी आजही डोळ्यात पाणी आणतात. त्यांच्या नसण्याची जाणीव आजही तीव्रतेने भासते', असे उदयनराजे म्हणतात. तसेच, संघर्षयोद्धा हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. तर, व्हिडिओच्या बॅकग्राऊण्डला गुरु एक तूची माझा विधाता, हे गाणं लावण्यात आलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनाही अनेकांनी हा व्हिडिओ पाठवला. त्यावर, आता पंकजाही भावूक झाल्या आहेत.  ''आज दिवसभर हा video अनेकांनी पाठवला.. व्यक्त ही झाले बरेच.. काय बोलावे आमचे भाऊ उदयनराजे निष्पाप मनाचे धनी.. मुंडे साहेबांचे नाव स्मृती मध्ये राहीलच! 40 वर्ष खस्ता खाल्ल्या, 4 दिवसात आम्ही पद घेऊ पण ती जागा घेऊ कशी ? राजेंचे अश्रू निव्वळ निष्पाप प्रेम आहे..'', असे कॅप्शन पंकजा यांनी हा व्हिडिओ रिशेअर करत दिले आहे. तसेच, उदयनराजे हे निष्पाप मनाचे धनी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

कार्यकर्त्याने भेट दिलेला फोटो

खासदार उदयनराजे भोसले हे सोमवारी शिखर शिंगणापुर येथे देव दर्शनासाठी गेले होते. यावेळी या ठिकाणाहून परत येत असताना उदयनराजे यांनी दहिवडी येथील चैतन्य अकॅडमीला भेट दिली. यावेळी संदीप खाडे यांनी हा फोटो उदयनराजे भोसले यांना भेट दिला. हा फोटो दिल्यानंतर उदयनराजे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. मात्र, या क्षणी उदयनराजेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे