शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे

By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2025 11:46 IST

सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर पोलिस अवघ्या ६.३६ मिनिटांत पोहोचल्याचे समोर आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये अवघ्या अडीच मिनिटांत पोलिसांनी मदत केली, तर मुंबई शहरात मदतीसाठी पोलिसांना तब्बल २१ मिनिटांचा वेळ लागला आहे. २०२४ या वर्षात १७ लाख २५ हजार लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात याची ट्रायल घेण्यात आली होती.

प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ साठी स्वतंत्र यंत्रणा आहे. एका ठाण्यात किमान ५ ते २० एमडीटी मशीन (मोबाइल डेटा टर्मिनल) आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉल येताच तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते, त्यामुळे हे लोक घटनास्थळी तत्काळ धाव घेतात.

  • लहान मुले टाइमपास म्हणून करतात कॉल

काही टवाळखोरांसह लहान मुले हे टाइमपास म्हणून ११२ वर कॉल करून खाेटी माहिती देतात. यापूर्वी बीडमध्ये एका अल्पवयीन मुलाने आजीच्या फोनवरून कॉल करून शाळेत बाॅम्ब असल्याची माहिती दिल्याने यंत्रणेची धावपळ झाली होती.

डायल ११२ ही हेल्पलाइन सामान्यांसाठी खूप आधार देणारी ठरत आहे. कॉल येताच मदतीसाठी आमचे पथक जाते. तक्रार खरी, खोटी हा नंतरचा भाग आहे. आम्ही दुर्लक्ष करत नाही.-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMira Bhayanderमीरा-भाईंदर