शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

राज्यातील ३५८ विशेष शिक्षकांना थकीत वेतनश्रेणी मंजूर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही 

By संदीप आडनाईक | Updated: March 31, 2025 14:19 IST

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा शासन निर्णय जारी

संदीप आडनाईककोल्हापूर : अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर)अंतर्गत कार्यरत ३५८ विशेष शिक्षकांना २०१८ पासून ७५००० रुपये प्रतिमहिना याप्रमाणे मार्च २०२५ पर्यंत थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. यामुळे या शिक्षकांच्या मूळ वेतनश्रेणीचा विषयही मार्गी लागणार आहे.

जयेशकुमार गंगाधरराव कर्डिले यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला असून, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठातील संबंधित याचिकाकर्त्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारे थकीत वेतनश्रेणीच्या निधीची तरतूद करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २१ मार्च रोजी जारी केला आहे.अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर)अंतर्गत शासन स्तरावर राज्यात २०१२ मध्ये ३१०५ दिव्यांग विशेष शिक्षकांना नियुक्त केले. त्यातील काही जणांना काही काळ वेतनश्रेणीनुसार वेतनही दिले. मात्र २०१८ आणि २०२१ मध्ये टप्प्याटप्प्याने बहुतेक शिक्षकांना पूर्वसूचना न देता योजना बंद झाल्याचे कारण देऊन कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले. तेव्हापासून त्यांना मानधनही दिले नव्हते. काही शिक्षकांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना मानधन तत्त्वावर २५००० रुपये दिले. परंतु, वेतनश्रेणीनुसार वेतन द्यावे म्हणून ३५८ शिक्षकांनी तीन खंडपीठांत धाव घेतली. त्यांना तूर्तास थकीत वेतनश्रेणीची रक्कम द्यावी, असा निर्णय आता न्यायालयाने दिला आहे.शिक्षण संचालक जबाबदारमूळ योजनेत अंतर्भूत वेतनश्रेणीवर न्यायालयाने निर्णय दिला आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मार्च २०२४ या कालावधीतील थकित वेतनाची रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी. अनियमितता झाल्यास त्या त्या विभागाच्या शिक्षण संचालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

केवळ वेतनश्रेणी मुद्यावरच वकिलांचा युक्तिवाद२०१८ ते आजपर्यंत शासन वेतनश्रेणी देत नव्हते आणि समायोजन करून ही मागची वेतनश्रेणीची रक्कम हातची जाणार होती. तारखा लावून घेत फक्त ‘वेतनश्रेणी’ या मुद्यावरच वकिलांनी युक्तिवाद केल्याने मागील वेतनश्रेणीची रक्कम या शिक्षकांना मिळणार आहे. ॲड. पवार, नागपूरचे ॲड. परचुरे, ॲड. विनोद पाटील, ॲड. पानपट्टे, ॲड. काझी, ॲड. हमझा पठाण , ॲड. अजीज, ॲड. योगेश पाटील, ॲड. मडये यांनी प्रयत्न केल्याने या वेतनश्रेणीतील ७५००० दरमहाचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने मिळवून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकHigh Courtउच्च न्यायालय