शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

शालाबाह्य मुले कागदावरच!

By admin | Updated: August 9, 2016 01:35 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने गतवर्षी ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले होते. परंतु, अद्याप अनेक शालाबाह्य मुले शहरातील अनेक रस्त्यांवरील सिग्नल व वाड्या वस्त्यावर भटकताना दिसून

नेहरुनगर : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने गतवर्षी ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले होते. परंतु, अद्याप अनेक शालाबाह्य मुले शहरातील अनेक रस्त्यांवरील सिग्नल व वाड्या वस्त्यावर भटकताना दिसून येत असून, या मुलांचे शिक्षणाचे पुनर्वसन फक्त कागदावरच केले का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून ६ ते १४ या वयोगटातील लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आला होता. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनेदेखील हे सर्वेक्षण करण्यात आले. गतवर्षी जुलै आॅगस्ट व यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील प्रत्येक भागातील वाड्या- वस्त्यांवर बांधकाम साइट जाऊन केला होता. या कामाकरिता महापालिकेच्या व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना हा सर्वे करण्यास सांगितले होते. काही शिक्षकांनी प्रामाणिकपणाने काम करीत शिक्षणापासून वंचित असलेले अनेक लहान मुलांना शोधून काढले होते. तर काही शिक्षकांनी मात्र बोगस सर्व्हे केला असल्याचे त्या वेळी ‘लोकमत’च्या टीम शहरातील अनेक भागांतील वाड्या- वस्त्यांवर जाऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन अनेक ठिकाणी शिक्षक सर्वेक्षणासाठी गेले नसल्याचे उघडकीस आणले होते.शहरातील रस्त्यांवर ६ ते १४ या वयोगटातील काही लहान मुले रस्त्यावर भीक मागताना आढळतात. नागरिक लहान मुलांकडे पाहून भीक देत असल्यामुळे अनेक पालक त्यांना चेहरामोहरा बदलून, त्यांची वेशभूषा बदलून त्यांना शहरातील प्रमुख रस्त्यावरील सिग्नलवर भीक मागण्यास प्रवृत्त करीत आहेत. तर काही मुले आत्मसन्मानाने भीक न मागता फुगे, झेंडे, खेळणी, मोटारीमधील छोट्या-मोठ्या वस्तू विकत आपले पोट भरीत आहेत. अनेक वेळा रस्त्यावर अशा प्रकारे वस्तू विकताना अपघात होण्याची शक्यतादेखील आहे. याचबरोबर अनेक लहान मुले रेल्वेस्थानक या ठिकाणी भीक मागत भटकत आहेत. काही लहान मुले चहाच्या टपऱ्या, हॉटेल गॅरेजवरही काम करतात.रस्त्यावर भीक मागणाऱ्या अथवा सिग्नलवर फुगे, इतर वस्तू विकणाऱ्या या शिक्षणापासून वंचित असलेल्या लहान मुलांकडे पदाधिकारी व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)