शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:36 IST

‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना...

- अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना निर्भयाचे वडील, भाऊ, तिच्या मैत्रिणी आणि कोपर्डीतील महिलांनी व्यक्त केली़कोपर्डीचा निकाल जाहीर होताच निर्भयाची आई व तिच्या मैत्रिणींनी हंबरडा फोडला. ‘माझ्या छकुलीला न्याय मिळाला. मात्र, तिचा आवाज आज कानावर येत नाही’, असे म्हणत पीडितेच्या आईला रडू कोसळले. त्यामुळे सर्वांचेच डोळे पानावले.निर्भयाची मैत्रीण आणि खटल्यातील महत्त्वाची साक्षीदार असलेली सायली (नाव बदललेले आहे) म्हणाली, शहरापासून दूर असलेल्या कोपर्डी या गावात आजही सुविधा नाहीत़ गावात सातवीपर्यंतच शाळा आहे़ पुढील शिक्षणासाठी कुळधरणला जावे लागते़ शाळेचा रस्ताही खराब झालेला आहे़ गावात पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी गावात पोलीस ठाणे उभारावे़निर्भयाचा भाऊही न्यायालयात होता. आरोपींना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी व्हावी त्यानंतरच आमच्या कुटुंबाला खरे समाधान मिळणार आहे़ घटनेनंतर कोपर्डी ग्रामस्थांसह मराठा समाज पाठीशी उभा राहिला. त्यामुळे मोठा धीर मिळाला़ मात्र, अशी घटना कुणासोबतच पुन्हा घडू नये, अशी भावना त्याने व वडिलांनी व्यक्त केली.आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता़ घटना घडल्यानंतर पोलीस अधिकाºयांनी योग्य तपास केला़ अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी हा खटला प्रभावीपणे लढविल्याने न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डीचे पोलीस पाटील समीर जगताप यांनी दिली. कोपर्डीच्या ग्रामस्थांसह मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात गर्दी केली होती.निकालानंतर न्यायालयाच्या परिसरातही ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा घुमल्या.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाMaharashtraमहाराष्ट्र