शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:50 IST

पक्षाच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्याचा हेतू अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संविधान हा आमचा वैचारिक गाभा आहे. संविधानाप्रति आदर नव्हे, तर संविधान विचारधारेवर आपापल्या जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. खंडप्राय आणि सर्वधर्मीय देश एकात्मतेच्या माध्यमातून अधिक मजबूत कसा करता येईल या दृष्टीने पक्ष काम करीत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.कालच ३४ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम सरकारने जमा केली आहे. यामुळे महिला वर्गात आनंदाचे, बंधुत्वाचे, विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही तटकरे म्हणाले.

विरोधक केविलवाणे

विरोधकांना काहीच बोलायला मिळत नसल्याने लाडकी बहीण योजनेवर ते टीका करीत आहेत. विरोधकांना एका दिवसात ३४ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल याची खात्री नव्हती. राजकीय अस्तित्वाची केविलवाणी धडपड करीत असताना महिलांप्रति राज्य सरकारने जी योजना आणली आहे त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागणार असल्याने ते संभ्रम निर्माण करीत असल्याची टीकाही तटकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनsunil tatkareसुनील तटकरे