शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:26 IST

शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे," असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. हिंदुत्वाचा भगवा, शिवधनुष्य आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडेच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच आमचं प्रतिबिंब!यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या पक्षात जी वाढ होत आहे, ती सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, या बाळासाहेबांच्या तत्वाचेच हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बाळासाहेबांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेशी गद्दारी!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. "बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला या लोकांनी शिवसेनेला बांधण्याचे काम केले," अशी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. "मुख्यमंत्रीपदासाठी जे लाचार झाले, ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सत्तेसाठी तडजोड करणार नाही!"सत्तेच्या खुर्चीसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही, हे वचन आम्ही दिले आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकांना निवडणुका आल्यावरच कार्यकर्त्यांची आठवण येते, अशी टीका करत त्यांनी "हम दो, हमारे दो" असे म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंना थेट सवाल"बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या. आता म्हणता आम्ही हिंदुत्व सोडले नाही, मग बाळासाहेबांना 'हिंदुहृदयसम्राट' तुम्ही का म्हणत नाही?" असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन