शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी: खासदार सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:00 IST

साहित्य कला संवादाच्या समारोपावेळी मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आमची लढाई कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाशी नाही तर त्यांच्या विचारधारेशी आहे. त्यामुळे ते आमचे शत्रू नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले. कुणाशी वाद झाला तरी चालेल; पण तो अगदी टोकाचा नसावा. दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची, त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद असली पाहिजे. परंतु, आज राजकारणात विचार मोडून टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तो मोडून काढला पाहिजे, असे खा. सुळे म्हणाल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य कला संवादाच्या समारोपाच्या सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण निगुडकर, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा नीरजा आणि आंतरभारती कला भवनाचे अध्यक्ष युवराज मोहिते उपस्थित होते.

  • आमच्यावर कुणीही टीका केली तर मजा येते. कारण, जेवढी टीका कराल तेवढी आमची मते वाढतात. आमच्याबद्दल ते असे विचार करतात, हे ऐकून मजा येते. कुणाशी भांडण करणे मला आवडत नाही. चर्चेमधून कोणतीही समस्या सुटू शकते. त्यावर मार्ग निघू शकतो. अशावेळी उद्रेक होण्याची वाट का पहावी?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
  • तुम्ही प्रभू रामाचे नाव घेता. मी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. माझीही त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे; पण मी जाहीरपणे सांगत नाही. श्रद्धा कुणावरही असावी; पण अंधश्रद्धा असू नये. पंढरपूरच्या पांडुरंगावरही माझे  प्रेम आहे; पण त्यासाठी सतत देवळात जाण्याची गरज नाही. तुम्ही जे काही कराल ते अगदी चांगल्या मनाने करा. तो तुमच्या पाठीशी उभा राहतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस