लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. १ आॅक्टोबरपूर्वी सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.तसेच मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह मुंबईकडे स्वतंत्रपणे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादीच्या मंथन दौºयाचा चौथा टप्पा विदर्भात होईल, असेही तटकरे यांनी सांगितले.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:26 IST