शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही - मराठा गोलमेज परिषद : ७ मेपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:01 IST

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणसह सर्व मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ७ मेनंतर मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात फिरू देणार नाही. त्यानंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येणार असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या गोलमेज परिषदेत देण्यात आला.

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणसह सर्व मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ७ मेनंतर मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात फिरू देणार नाही. त्यानंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येणार असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या गोलमेज परिषदेत देण्यात आला.मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने येथील रेसिडेन्सी क्लबवर शनिवारी गोलमेज परिषद घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेत महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून ३० हून अधिक मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. वसंतराव मोरे हेही प्रमुख उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाने काढलेल्या ७ शासकीय अध्यादेशांबाबत चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. ते कसे फसवे आहेत याचे विवेचन सुरेश पाटील यांनी केले. मराठा समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी काढलेल्या या अध्यादेशांची प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.महामंडळाच्या संचालकांचाही धक्कादायक खुलासापरिषदेत (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक अंकुशराव पाटील हे उपस्थित होते. त्यांनीही, चर्चा करताना शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत काढलेल्या शासकीय अध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक केल्याचे सांगितले. तसेच मराठा समाजाने यासाठी तीव्र लढा उभारावा, असेही सुचविले.परिषदेत केलेले ठराव१) (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजाला वगळावे अगर हे महामंडळच बरखास्त करावे.२) मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वसतिगृह बांधून द्यावे, तोपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वार्षिक वसतिगृह भत्ता ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ४० हजार रुपये व शहरी विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपये करावा.३) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे खोटे, फसवे शासकीय अध्यादेश काढू नयेत. शासनाने अशा नावात छत्रपतींचे नाव वापरू नये.४) शेतकºयांच्या पाठीशी राहून त्यांना स्वामीनाथन आयोग लागू करा़

टॅग्स :marathaमराठा