शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा २६ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 05:45 IST

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक कोपरखैरणेत पार पडली.

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक कोपरखैरणेत पार पडली. या वेळी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा २६ नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आगामी भूमिका ठरविण्यासाठी सोमवारी कोपरखैरणेत राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख २० मागण्यांचा निर्णय सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत घ्यावा, अन्यथा २६ नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय बैठकीत राज्यातील प्रमुख व्यक्तींची कोअर कमिटी गठीत करण्यात आली. या कमिटीमार्फत मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत भूमिका व निर्णयांची घोषणा केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेला मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून परस्पर घोषणा करण्यावर मज्जाव करण्यात आला आहे. मागील आंदोलनावेळी संघटनेच्या नावाचा वापर करून वेगवेगळे निर्णय घेऊन संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. यापुढे तसे होऊ नये, याकरिता ही कमिटी गठीत करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबई समन्वयक अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कोपरखैरणेत पाच तास चाललेल्या बैठकीत राज्यभरातून सुमारे दोनशे प्रमुख सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या आगामी भूमिकेविषयी चर्चा झाली. त्यामध्ये आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात बदल करावा, राज्यात दुष्काळ घोषित करावा, अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. शिवाय हिवाळी अधिवेशन लांबणार असेल तर मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशीही मागणी केली आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण