शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

...अन्यथा मुख्यमंत्र्यांचा घरासमोर आंदोलन करणार

By admin | Updated: June 29, 2016 21:02 IST

राज्यातील शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची गाडी ह्यनाहरकतह्ण प्रमाणपत्रांमुळे अडली आहे. यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने आॅक्टोबर २०१५ पासून प्रलंबित ठेवला आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २९  : राज्यातील शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची गाडी ह्यनाहरकतह्ण प्रमाणपत्रांमुळे अडली आहे. यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने आॅक्टोबर २०१५ पासून प्रलंबित ठेवला आहे. यामुळे नव्या सत्राची प्रवेशप्रक्रिया रखडली असून महाविद्यालयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाहरकत प्रमाणपत्रांचा हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विदर्भ शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालय कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने डिसेंबर २०१४ रोजी एमपीएड वगळता इतर सर्व शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले. परिषदेच्या नव्या निर्देशानंतर शासनाने विद्यापीठांच्या ह्यबीसीयूडीह्ण संचालकांना पत्र पाठवून सर्व महाविद्यालयांची तपासणी करण्यास सांगितले होते. दरम्यान, उच्च शिक्षण सहसंचालकांनी २९ ते ३१ मार्चदरम्यान सर्व महाविद्यालयांची तपासणी केली. या तपासणीनंतर नागपूर विभागातील २०९ पैकी केवळ ६ शिक्षण महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी शिफारस उच्च शिक्षण विभागाद्वारे राज्य शासनाकडे करण्यात आली.संबंधित तपासणीची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तपासणी समितीचे बहुतांश सदस्य शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालयांशी संबंधितच नव्हते. त्यांना राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या नव्या नियमांबाबत माहितीच नव्हती. या समित्यांचा अहवालच नियमबाह्य होता, असा आरोप कृती समितीतर्फे लावण्यात आला आहे.विदर्भ शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालय कृती समितीची सभा महात्मा फुले सभागृहात पार पडली. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने दिलेल्या सुधारित आदेशानुसार ज्यांना आपले महाविद्यालय एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित करायचे आहे, त्यांच्यासाठीच ह्यनाहरकतह्ण प्रमाणपत्राची अट टाकण्यात आली आहे. असे असताना शासनातर्फे सर्वच महाविद्यालयांची कोंडी का करण्यात आली आहे, असा सवाल या सभेत उपस्थित करण्यात आला.