शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या व्हिडीओने टोइंग प्रकरणाला नवे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 07:46 IST

मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस ‘इकडे आड, तिकडे विहीर’ 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. नव्या व्हिडीओनुसार टोइंगची कारवाई टाळण्यासाठी गाडी मालकाने आपल्या पत्नीच्या साथीने बनाव रचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हिडीओची सत्यता न तपासताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आमची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाल्याची भावना वाहतूक पोलीस व्यक्त करीत आहेत. मालाड येथील टोइंग प्रकरणात रविवारी नवा व्हिडीओ समोर आला. यात निलंबित पोलीस कर्मचारी शशांक राणे यांनी ‘नो पार्किंग’मध्ये थांबलेली कार टो करण्याचे निर्देश दिले तेव्हा गाडीत कोणीही बसलेले नव्हते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा कार ‘टो’ करण्यासाठी क्रेनला जोडली जात असताना कारमालक युवराज माळी आणिं त्याची पत्नी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पोलीस कारवाईला विरोध केला. वाहतूक पोलिसांनी नियमानुसार कारवाई करत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला होता. कारवाई सुरू झाली तेव्हा कारमध्ये कोणीही नसल्याचे शंशाक राणे यांच्या सहकार्‍याने चित्रित केलेल्या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. कारमालक पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई होत असल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे.

चौकशीनंतर बोलणार शनिवारी समोर आलेल्या व्हिडीओनुसार संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसर्‍या व्हिडीओबाबत २ ते ३ दिवसांत चौकशीअंती अहवाल सादर करण्यात येणार आहे. चौकशी अहवालानंतर या विषयावर भाष्य करणार आहे.- अमितेश कुमार, सहआयुक्त, वाहतूक पोलीस 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबई