शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

सरकारच्या इतर योजनांसारखीच पंतप्रधान उज्ज्वला योजना फसवी – चित्रा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:43 IST

पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चूलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टीका...

 मुंबई  – पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चूलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.दरम्यान पंतप्रधान उज्वला योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होत नसल्याचे वास्तव मांडणारी चित्रफित केल्याचीही माहिती चित्रा वाघ यांनी पुराव्यानिशी दिंली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आपल्याला रोज नवनवीन घोषणा ऐकायला मिळत असून त्याचा फायदाच जनतेला होत नसल्याचा आरोपही केला.पंतप्रधान उज्वला योजनेचे वास्तव मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या ६ जिल्हयातील महिलांशी संवाद साधला असून त्या महिलांचे दु:ख चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.ही योजना लोकांना परवडत नसल्याने पुन्हा त्यांना चुलीवर यावे लागले आहे. या चुली म्हणजे रोगांना निमंत्रण असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. जनतेने गॅस सिलेंडर कनेक्शन घेतल्यामुळे रेशनवर मिळणारे रॉकेलही सरकारने बंद केले त्यामुळे सर्रास प्लास्टीक वापरलं जातयं जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कनेक्शन घेण्यासाठी २०० रूपयांपासून कुठे २२०० तर कुठे ८२०० पर्यंत पैसे घेतले गेले आहेत. लोकांच्या माथी ही उज्वला योजना मारण्यात आल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी यावेळी केला.रिकामे सिलेंडर नेण्यासाठी आणि भरलेला सिलेंडर आणण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना १५० रुपये तर प्रवासखर्चाचे १०० रूपये मिळून १ सिलेंडरसाठी १००० रूपये मोजावे लागतात हे वास्तव चित्रफितीमध्ये महिलांनी उघड केले आहे. अर्थसंकल्पात सांगितले गेले की ५ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ झाला आणि आणखी ८ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ होणार परंतु आता नक्की किती लाभ झाला आहे हे लोकंच सांगत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या फसव्या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आम्ही आणखी अभ्यास करू. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वास्तव समोर आणू. आणि लोकांची खंत पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवून लोकांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.सरकारच्या इतर योजनांसारखीच ही योजनाही फसवी असून सरकारच्या फसव्या घोषणांच्या धुरामध्ये लोकांची घुसमट होत आहे असेही चित्रा वाघ म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला महिला उपाध्यक्षा सोनल पेडणेकर,डॉ.भारती पवार, प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार