शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 08:51 IST

राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे.

मुंबई : राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्याकरिता अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांच्या  कोरोना काळात हा आकडा कमी झाला. मात्र, गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आकडा वाढला आहे. राज्यभरात  २०२२ या वर्षात १०३ मेंदूमृत अवयवदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही शेकडो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 

राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे. या जिल्हानिहाय समिती आपल्या परिसरातील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयातील रुग्णाच्या प्रतीक्षा यादीचे काम पाहत असतात, तसेच मेंदूमृत अवयवांचे वाटप नियमाप्रमाणे करत असतात. मेंदूमृत अवयव दान प्रक्रियेत पुणे आणि मुंबई या विभागीय समितीचे अवयदान मोठ्या प्रमाणावर असते.

गेली मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून कमी अवयवदान झाले. त्या अगोदरच्या अवयवदानाचा आकडा मोठा होता. येत्या काळात नक्कीच हा आकडा वाढेल असा मला विश्वास आहे. कारण नागरिकामंध्ये याबाबतची जनजागृती होत आहे. सर्व विभागीय समिती अवयवदानाचा आकडा वाढावा म्हणून प्रयत्न करीत आहे. २०१९ सालात मोठ्या प्रमाणात अवयवदान झाले होते. मात्र त्या नंतरच्या काळात कोरोनामुळे आकडा कमी झाला. अवयवाची गरज पाहता नक्कीच अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे.  - डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था. 

मोठ्या रुग्णालयांना मेंदूमृत रुग्णाचे अवयव काढून घेण्यासाठीची परवानगी शासनाने दिली पाहिजे. कारण अशा रुग्णालयात मेंदूमृत व्यक्ती असतील तर त्याचे अवयव घेताना त्रास होतो. तसेच या रुग्णालयांनी ज्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात त्यांच्यासोबत संलग्न व्हावे. त्यामुळे मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान वाढू शकते. तसेच शासकीय रुग्णालयात मेंदूमृत रुग्ण ओळखून तेथील अवयवदान वाढविले पाहिजे. - डॉ. सुरेंद्र माथूर, अध्यक्ष, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती

अवयवनिहाय रुग्णांची प्रतीक्षा यादी किडनी     : ५७७७ यकृत      : १४७८ हृदय      : १३१ फुफ्फुस     : ४० स्वादुपिंड     : ५७ छोटे आतडे     : ११ 

टॅग्स :Organ donationअवयव दानHealthआरोग्य