शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण: मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:25 IST

न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई - न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने आज अध्यादेश जारी केला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाबाबत दिलासा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामधील जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच प्रवेशाची मुदत ही 25 मेऐवजी 31 मे पर्यंत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश कायम ठेवण्यात येतील,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षण लागू कऱण्याच्या निर्णयामुळे नुकसान होणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीही राज्य सरकारकडून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.  दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. मात्र प्रवेश कायम झाल्याचे पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र