शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:13 IST

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची सूचना

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध येतो, ज्यांना विशिष्ट पदावर तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ झाला आहे, अशा आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत. त्यानुसार या बदल्या केल्या की नाही याचा आढावा दोन दिवसांत आयोग घेणार आहे. 

अलिकडेच पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सांगितले. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणूक काळात प्रत्यक्ष फिल्डवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याशी ज्यांचा संबंध येतो, तीन वर्षांपासून जे एकाच पदावर आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभाग लवकरच काढेल, अशी दाट शक्यता आहे. 

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, मुंबईतील सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण  सहपोलिस आयुक्त (प्रशासन) जयकुमार, सहपोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम असे काही आयपीएस अधिकारी आहेत की, त्यांना या पदांवर तीन वर्षांहून अधिकचा कार्यकाळ झाला आहे.  

मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल, पण अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असेल हे आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. महापौरांची आरक्षण सोडत ही नगरविकास विभाग काढतो. लवकरच ही कार्यवाही केली जाईल, असे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अशी सोडत काढण्याचे निर्देश नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत. 

जि.प.निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होणार१२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वा १० तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक नाही अशाच या जिल्हा परिषदा असून तेथेच निवडणूक आयोग पहिल्या टप्प्यात निवडणूक घेणार आहे. महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ तारखेला निकाल जाहीर होतील. त्याच्या आठ दहा दिवस आधी जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम आयोग जाहीर करेल अशी शक्यता आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे सर्वात अगोदर  राष्ट्रीय मान्यताप्राप्त पाच राजकीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी व आम आदमी पार्टीचा समावेश आहे. राज्यस्तरीय पक्षांमध्ये शिंदे सेना, उद्धव सेना, अजित पवार गट, शरद पवार गट व मनसेचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मान्यताप्राप्त इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष असे - भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लिग, एआयडीएमके, जनता दल युनायटेड, एमआयएम, ऑल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक, भारत राष्ट्र समिती. 

अधिसूचना निघालीजिल्हा परिषद आणि पंचायत समित्या मतदानामध्ये ईव्हीएमवर उमेदवारांचा क्रम कसा असेल, याबाबतची अधिसूचना ग्रामविकास विभागाने सोमवारी काढली. महापालिका निवडणुकीतही असाच क्रम असेल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Transfer orders issued for IPS officers; Election Commission to review.

Web Summary : The Election Commission has ordered the transfer of IPS officers serving over three years in key posts related to upcoming municipal elections. A review is scheduled. Several officers, including police commissioners of Navi Mumbai and Pimpri Chinchwad, are likely to be affected. Zilla Parishad elections are expected in January.
टॅग्स :PoliceपोलिसMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६