शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनला स्थगितीचे आदेश

By admin | Updated: July 20, 2015 01:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ ‘नवीनह्ण स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास स्थगिती आदेश जारी केले आहेत. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ ‘नवीनह्ण स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास स्थगिती आदेश जारी केले आहेत. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या आठवडयात ‘नवीन’ स्वातंत्र्यसैनिकांना मंजूर पेंशन घोटाळा आरटीआय माध्यमातून समोर आणला होता, ज्यात ३ मृतांचा समावेश होता.बीड मधील ७९, अहमदनगरमधील ४, उस्मानाबाद ४ आणि नांदेडमधील १ अशा ८८ प्रकरणास गेल्या काही महिन्यात मंजूरी दिली होती. बीडचे जिल्हाधिकारी यांनी पूर्वीचे ११८४ स्वातंत्र्यसैनिक आणि ७९ नवीन प्रकरणे यांस जोडत १६ कोटी रु पयांची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. पूर्वीच्या नियमित स्वातंत्र्यसैनिकांना ७ कोटी ६६ लाख ६८ हजार ५०० रुपये आणि नवीन स्वातंत्र्य सैनिकांना ८ कोटी ५१ लाख ९७ हजार ५५० रु पये देण्यासाठी अतिरिक्त रक्कम जिल्हा कार्यालयाने मागितली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या वारसाना पेन्शन देण्यापासून स्थगिती दिली आहे. तीन स्वातंत्र्यसैनिकांच्या मृत्युमुळे सदर आदेश जारी केला गेला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक २९ मे २०१५ रोजी शासनास कळविले की संभाजी अंबुजी खांडे यांचा मृत्यु दिनांक २५ आॅक्टोबर २०११ रोजी आणि पत्नी मथुराबाई संभाजी खांडे यांचा मृत्यु दिनांक ८ सप्टेंबर २०१४ रोजी झाला असून वारस मुलगा शहाजी थकबाकी मागत आहे. जनाबाई लक्ष्मण येवले यांचा मृत्यु दिनांक २२ आॅगस्ट २०१२ रोजी झाला असून मुलगा अरु ण येवले थकबाकी मागत आहे तर जलसुबाई तुकाराम भोसले या ३० डिसेंबर २००९ रोजी मृत झाल्या असून सून जयश्री गौतम भोसले थकबाकीची मागणी करत आहे.बीड जिल्हा आणि बोगस स्वातंत्र्यसैनिक असे जुने समीकरण आहे. वर्ष २००७ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती ए.बी.पालकर यांनी २९८ बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पेन्शन रद्द करण्याची शिफारस केल्यानंतर शासनाने त्यास अनुकुलता दर्शविली होती. (विशेष प्रतिनिधी)