शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 05:16 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले.

औरंगाबाद/अहमदनगर/नाशिक : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. हे आदेश तात्काळ अमलात आणण्याची सूचनाही त्यांनी केली. मात्र, पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. नाशिक जिल्ह्यातील काही जणांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पाणी सोडण्यासाठी नाशिक, नगर जिल्ह्यांतून विरोध होत आहे.राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भातील आदेश निघण्यास विलंब होत होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ पाणी सोडा, असा आदेश नियमन प्राधिकरणाला द्यावा लागला. या आदेशानंतर महामंडळाने मंगळवारी सकाळीच उर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश दिले.दुष्काळ स्थितीत वा जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांहून कमी झाल्यावर नाशिकच्या धरणांतील पाणी जायकवाडीमध्ये सोडावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला आहे. त्यानुसार, पाणीसाठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिकमधील चार धरणांतून ८.९९ टीमसी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.>वरच्या धरणांतून असे सोडणार पाणीधरणे पाणीसाठा सोडण्यात येणारे पाणी(टक्केवारी) (दलघमी/टीएमसी)मुळा ९७.९८ ५४.००/१.९०प्रवरा १०६.८५ १०९.००/३.८५गंगापूर १२०.१४ १७.००/०.६०गोदा-दारणा ११४.१० ५७.५०/२.०४पालखेड १२०.७७ १७.००/०.६०एकूण १०९.९७ २५४.५०/८.९९

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण