शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

विमान उड्डाणात अडसर ठरणा-या मुंबईतल्या 70 इमारतींची उंची कमी करण्याचे आदेश

By admin | Updated: July 16, 2017 11:34 IST

विमानाच्या उड्डाणात अडथळा आणणा-या मुंबईतल्या 70 इमारतींना उंची कमी करा

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 16 - विमानाच्या उड्डाणात अडथळा आणणा-या मुंबईतल्या 70 इमारतींना उंची कमी करा, असे आदेश नागरी उड्डयन संचलनालयानं दिले आहेत. उंची कमी करण्यासाठी सांगण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर परिसरातील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची उंची कमी करण्यासाठी 60 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. या 70 इमारतींना जून महिन्यात नागरी उड्डयन संचालनालयाचे नोटीस बजावली होती. नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये 50 वर्षांहून जुन्या इमारतींचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणानेच 1978पासून या इमारतींना "ना हरकत प्रमाणपत्र" बहाल केले होते. नोटीस बजावण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांकडे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे आहेत. मात्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली कागदपत्रे बोगस असल्याचा दावा नागरी उड्डयन संचलनालयानं केला आहे. जूनमध्ये नोटीस बजावून विमानाच्या उड्डाणात अडसर ठरणा-या इमारतीच्या सोसायट्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. नोटिसीत ऑगस्ट महिन्यापर्यंतची मुदतही दिलीय. नागरी उड्डाण संचलनालयाच्या आदेशामुळे आता या इमारतींना 1 ते 6 मीटरनं उंची कमी करण्यासाठी पाडकामही करावे लागणार आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डयन संचलनालयाला विमानांच्या उड्डाणात अडथळा आणणाऱ्या इमारतींची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नागरी उड्डयन संचलनालयानं ही कारवाई केली आहे. नागरी उड्डाण संचलनालयाकडून आदेश देण्यात आल्यानंतर 10 सोसायट्यांच्या प्रतिनिधींची विलेपार्ले येथे बैठकही पार पडली. दोन मजल्यांच्या इमारतींची उभारणी 1960मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिसूचना किंवा आदेश सोसायट्यांना देण्यात आले नव्हते, असा नोटीस बजावण्यात आलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांचा दावा आहे. 2016मध्ये नागरी उड्डाण संचलनालयाने या सोसायट्यांकडे उंची, एरोड्राम रेफरन्स पॉटपासूनचे अंतर आणि उभारणीचे वर्ष यासंबंधीची माहिती मागवली होती.