शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:13 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केल्याचा आरोप त्यांनी प्रचारसभेत केल्याने भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे विधान राहुल गांधी यांनी भरसभेत केले होते. या प्रकरणावरूनच भिवंडी न्यायालयात राहुल गांधींविरोधात सुनावणी सुरू आहे. राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप नोंदवत संघाकडून भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा .स्व. संघावर टीका केल्याने, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात 6 मार्च 2014 रोजी याचिका दाखल केली होती. 

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का ? असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा वापर करत भाजपा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करु शकतं. भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीbhiwandiभिवंडी