शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

जिप्समला उत्पादनबंदीचा आदेश

By admin | Published: March 06, 2017 3:26 AM

जिप्सम कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला

वाडा: तालुक्यातील नारे ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या जिप्सम कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे.या कंपनीत जिप्सम पावडर व शीटचे उत्पादन घेतले जाते. सन २००४ पासून सुरू असलेल्या या कंपनीच्या प्रदूषणामुळे मागील सात आठ वर्षांपासून गावात जमीन, पाणी व हवेचे प्रदूषण होऊन ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन व आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार ग्राम पंचायतीने विविध शासकीय पातळीवर व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या.या तक्र ारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वेळा तपासणी करून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कंपनीने ५ व २३ जानेवारी रोजी खुलासा केला होता, परंतु तो प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला होता. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन यांनी २ मार्च रोजी त्यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन व तक्रारदार ग्रामपंचायत यांची सुनावणी घेतली. त्यात तक्र ारदारांनी सादर केलेले पुरावे , प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सादर केलेले तपासणी अहवाल यानुसार कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात पाणी प्रदूषण. नियंत्रण व नियमन कायदा १९७४, हवा प्रदूषण नियंत्रण व नियमन कायदा १९८१, व धोकादायक वस्तूंची विल्हेवाट लावणे कायदा २००८ यांचा भंग करत असल्याचे सिद्ध झाले. व्यवस्थापन याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा करू शकले नाही. त्यामुळे कंपनीला ७२ तासात उत्पादन बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कंपनीचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात येतील असेही म्हटले आहे. दरम्यान तक्रारदार उपसरपंच सुधीर पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश हा ग्रामस्थांनी केलेला संघर्ष, ग्राम पंचायतीने केलेला पाठपुरावा व या मुद्यावर वृत्तपत्रांनी दिलेला पाठिंबा या हा विजय आहे. या पुढेही कंपनीच्या अन्य बेकायदेशीर कामांबाबत आमचा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले.