शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील ईस्टिंम इंडस्ट्रियल कंपनी बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: September 24, 2016 14:37 IST

विक्रमगडमधील ईस्टिंम इंडस्ट्रियल कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून शेकडो स्थानिकांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे.

राहूल वाडेकर, ऑनलाइन लोकमत
विक्रमगड, दि. २४ -  विक्रमगड़ तालुक्यातील एकमेव कंपनी इस्टिंम इंडस्ट्रीयल ह्या  कंपनीला वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्यामुळे सादर कंपनीचे उत्पादन प्रदुषण निर्माण करणाऱ्या घटकाचे उस्तर्जन व कंपनीचे उत्पादन पुढील आदेश  येईपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  कंपनीच्या  सोडण्यात आलेल्या कैमिकल युक्त पाण्यामुळे आलोंडे  ह्या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झ्ाले आहे.तसेच ह्या कैमिकल युक्त पाण्यामुळे गावातुन वाहणाऱ्या ओहळात पूर्णपणे पाणी फेसाळ बनल्यामुळे ह्या ओहळातील मासे,खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते.
   मात्र ह्या शासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांवर बेरोजगरचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
सदर कंपनीच्या वेवस्थापनाकड़े विचारणा केली असता हे घटना ही एखाद्या अधन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हे जाणून-भुजं केले असून ह्याबबत आम्ही विक्रमगड़ पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे.तसेच झ्ालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनीप्रशासन तयार आहे.मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत.
 
प्रतिक्रिया 
 
सदर कंपनी बंद झ्ाल्यास येथील स्थानिक असलेल्या शेकडो आदिवाशी तसेच इतर समाज्याच्या तरुणांवर बेरोजगाराची कुराड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करने हा पर्याय नासून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झ्ाले आहे त्यांना तत्काल नुकसानभरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी..व कंपनीने आपली सुरक्षावेवस्था वाढऊन  असे प्रकार पुढील काळात घडू नयेत याची काळजी घ्यावी.
    -  डॉ.सिद्धार्थ सांबरे ,  सामाजिक कार्यकर्ते
-------------------------------------
मी विक्रमगड तालुक्यातील बोरसेपाडा येथील तरुण असून आलोंडा येथील कंपनी चालू झ्ाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी ह्या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. जर ही कंपनी प्रशाशासनाने बंद केल्यास मी व माझ्यासरख्या अनेक आदिवाशी तरुणांवर बेरोजगरिची कुऱ्हाढ कोसळनार आहे.त्यामुळे आमच्या कुटुंबावर  उपासमारीची वेळ आली आहे.
     - बाळू सहारे, (आदिवाशी स्थानिक कामगार)
 
शासनाने तदकाफड़की निर्णय घेऊन आलोंडा येथील इस्टिंम प्रा.ली. कंपनीला सील ठोकला आहे त्यामुळे  आमच्यावर बेरोजगरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनानीयोग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी.नाहीतर येथील बेरोजगार झालेल्या तरुणांना पर्यायी वेवस्था निर्माण करुन द्यावी. नाहीतर ह्या कंपनीत शेकडो बेरोजगार झ्ालेल्या तरुणांना आंदोलन करावे लागेल.
    - सतेज ठाकरे, ( स्थानिक कर्मचारी)