लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले बांदेकर यांचे नाव ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते.शिर्डी आणि पंढरपूर संस्थांचे अध्यक्षपद युतीमध्ये भाजपाकडे असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेच्या कोट्यात आहे. भाजपा-शिवसेना आघाडीचे सरकार येऊन पावणेतीन वर्षे झाली; तरी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेला काही कायदेशीर अडचणींमुळे मिळू शकलेले नव्हते. बांदेकर यांच्या नियुक्तीने तो मार्ग मोकळा झाला आहे.
सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:45 IST