सोलापूर : माळढोक पक्ष्यांसाठी आरक्षित जमिनीचा व्यवहारप्रकरणी माजी मंत्री पतंगराव कदम आणि त्यांचा मुलगा विश्वजित यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मोहोळमधून भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून मुख्य न्यायदंडाधिकारी कंकणवाडी यांनी हे आदेश दिले.आतापर्यंतच्या सुनावणीस कदम पिता-पुत्र हजर झाले नव्हते़ गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी कंकणवाडी यांनी या प्रकरणात त्यांना २२ जून रोजी सोलापूरच्या न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले़ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष शांतीकुमार बोडके यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे़ (प्रतिनिधी)
पतंगरावांना हजर होण्याचे आदेश
By admin | Updated: June 13, 2015 02:13 IST