शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील ‘कागदी उंदीर’ भोवणार;अभियंत्यावर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:48 IST

मंत्रालयातील उंदरांमुळे सरकारची बदनामी झाल्याने, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

- गणेश देशमुखमुंबई : मंत्रालयातील उंदरांमुळे सरकारची बदनामी झाल्याने, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा विधानसभेत मांडून, सरकारला घरचा आहेर दिल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी खडसे हल्ली सोडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उंदीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यामुळे बांधकाममंत्री पाटील यांनी शुक्रवारी आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांची तत्काळ बैठक घेऊन सर्वांना फैलावर घेतले. उंदीर निर्मूलनाच्या प्रकरणात उपअभियंता अशोक बागुल आणि शाखा अभियंता रेष्मा चव्हाण हे दोषी असल्याची बाब बैठकीत समोर आली. दोषी अभियंत्यांवर तातडीने कडक कारवाईचे आदेश बांधकाममंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मंत्रालयात उंदीर वाढल्याची कुठल्याही विभागाची तक्रार नसताना, शाखा अभियंता रेश्मा चव्हाण, उपअभियंता अशोक बागुल, आणि कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी उंदीर न मारता, ४ लाख ७९ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात तक्रारीत होता. तिघांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.३ लाख १९ हजार ४०० उंदीर नव्हे, गोळ्या!मंत्रालय आणि सभोवतालच्या अ‍ॅनेक्स इमारतीमधील उंदीर मारण्यासाठी ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या पुरविण्यात आल्या होत्या आणि उंदीर मारण्यावरील एकूण खर्च ४ लाख ७९ हजार १०० रुपये इतका आला होता. याचा अर्थ, ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले असे नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.- उंदीर मारण्यासाठी एकूण दोन निविदा काढण्यात आल्या. दोन्ही निविदा ३ मे २०१६ रोजी विनायक मजूर सहकारी संस्था मर्यादित यांना देण्यात आल्या. या दोन निविदांप्रमाणे ३ लाख १९ हजार ४०० इतक्या गोळ्या पुरविण्यात आल्या. एका गोळीची किंमत दीड रुपया इतकी होती. संपूर्ण कामासाठी ४ लाख ७९ हजार १०० रुपये खर्च करण्यात आले, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMantralayaमंत्रालय