शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा उत्पादकांना मिळणार दज्रेदार कलमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:42 IST

विदर्भातील संत्रा उत्पादकांना दज्रेदार व आवश्यकतेनुसार संत्र्याच्या कलमा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संत्रा महोत्सवात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीच्या रोपवाटिकेचे नियोजन व प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केली दोन कोटी देण्याची घोषणारोपवाटिकेचे क्षेत्र वाढणार!

राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील संत्रा उत्पादकांना दज्रेदार व आवश्यकतेनुसार संत्र्याच्या कलमा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संत्रा महोत्सवात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीच्या रोपवाटिकेचे नियोजन व प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे.राज्यातील सर्वाधिक १ लाख ५0 हजार हेक्टर संत्र्याचे क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भाच्या नागपुरी संत्र्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ख्याती आहे. भौगोलिक निर्देशांक मिळाल्यानंतर या संत्र्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यासाठी गुणवत्ता व दज्रेदार कलमा संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. विदर्भात नागपूर जिल्हय़ात नागपूर व काटोल येथे प्रादेशिक संत्रा रोपवाटिका केंद्र आहे; पण या रोपवाटिकांमध्ये दरवर्षी प्रत्येकी ४५ ते ५0 हजार एवढय़ाच कलमांची निर्मिती केली जाते. तथापि, यापेक्षा मागणी अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांनी रोपवाटिकेसाठी दोन कोटी देण्याचे जाहीर केले. रोपवाटिकेचे क्षेत्र वाढल्यास दीड लाखांपर्यंत दरवर्षी संत्रा कलमांची निर्मिती करता येईल, असा कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे.विदर्भात मागील पाच वर्षे इंडो-इजराइल संत्रा प्रक ल्प राबविण्यात आला. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतावर या प्रक ल्पांतर्गत गादीवाफा तंत्रज्ञान राबविण्यात आले. ६ बाय ३ अंतरावर संत्रा कलमा लागवड तसेच त्यासाठी ठिबक व अन्नद्रव्य व्यवस्थानाबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात आले. यात भरघोस फायदा झाला असून, जेथे ९ ते १0 टन  उत्पादन होत होते. तेथे इंडो-इजराइल प्रकल्प तंत्रज्ञान अंतर्भावाने हेक्टरी संत्रा उत्पादन ३२ टनावर पोहोचले. याचनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या प्रकल्पाच्या तंत्रज्ञानाची शिफारस शासनाला केली असून, शासनाने याचा अंतर्भाव केला. त्यामुळे यावर्षीपासून मनरेगांतर्गत हा प्रकल्प राबविण्याचे ठरले आहे. संत्रा फळ पिकावर ‘डिंक्या’(फायटोपथेरा) बुरशीजन्य रोगामुळे संत्रा झाडांचा मोठय़ा प्रमाणात र्‍हास होतो. तथापि, इंडो-इजराइल तंत्रज्ञानामुळे फायटोपथेरा रोगाला तो सहसा बळी पडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी विदर्भात जवळपास १ हजार ५00 हेक्टरवर इंडो-इजराइल तंत्रज्ञानांतर्गत संत्रा लागवड करण्यात आली.

विदर्भातील शेतकर्‍यांना दज्रेदार संत्रा कलमा उपलब्ध होऊन संत्रा क्षेत्र वृद्धी व्हावी, यासाठी समृद्ध रोपवाटिका तयार करण्यात यावी, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यानुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.- डॉ. डी. एम. पंचभाई,विभाग प्रमुख, उद्यान विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ