शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:21 IST

'केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे प्रयत्न फसले'

सांगली : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे हे प्रयत्न फसले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीची गळचेपी होत असल्याबाबात राज्यपालांकडे तथाकथित विरोधी पक्षनेत्यांनी तक्रारीही केल्या. हे सरकार अस्थिर व्हावे, काही मोठे प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्यांना काहीतरी धडपड करता यावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यांचे हे उद्योग यशस्वी होऊ शकले नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे प्रयत्न फसले.

राज्यात महाविकास आघाडीचे हे सरकार पुन्हा नव्या जोमाने काम करेल. कोरोनाविरोधातील लढाईत यशस्वी होणार आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती करण्यासाठीसुद्धा सरकार सक्षम असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. राज्यपालांकडे आम्ही दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडीबाबत विनंती केली होती. विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे गेल्याने आमच्यासमोर राज्यपाल नियुक्त दोन जागांशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे ९ एप्रिलला प्रथम विनंती केली होती.

मंत्रिमंडळाच्या ठरावासह केलेल्या मागणीस राज्यपालांचा प्रतिसाद मिळाला नाही. २८ मे पूर्वी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका घ्याव्यात म्हणून निवडणूक आयोगाकडे मागणी केली.  सूरक्षित अंतर ठेवून या निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात, अशी खात्री आम्ही दिली. त्यानंतर आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पदासाठी निर्माण झालेली अडचण दूर झाली आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील