शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अंधश्रद्धेविरुद्ध विचारप्रवृत्त करणारी कलाकृती

By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST

कुठलीही सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या माणसाला समजातील विसंगती, बुवाबाजी, अंधश्रद्धा अस्वस्थ करणारीच असते. दैववादी समाजाचा लाभ उठविणारी काही मंडळी लोकांची दिशाभूल करतात

दाभोलकरांचे भूत नाटकाचा दुसरा प्रयोग : नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला समर्पित नाट्य नागपूर : कुठलीही सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या माणसाला समजातील विसंगती, बुवाबाजी, अंधश्रद्धा अस्वस्थ करणारीच असते. दैववादी समाजाचा लाभ उठविणारी काही मंडळी लोकांची दिशाभूल करतात तेव्हा प्रत्येक डोळस माणसाला वेदना होतात पण अनेकदा हा विरोध त्याला खुलेपणाने करता येत नाही. एकूणच व्यवस्था अंधश्रद्धेला खतपाणी घालत असते. काही स्वार्थांध लोकांचा दबावही याला कारणीभूत ठरतो. पण आपल्या संपर्कात असलेल्या एखाद्या माणसाच्या मृत्यूलाही न्याय मिळत नाही तेव्हा माणूस व्यथित होतो. हाच धागा नेमकेपणाने पकडत अंधश्रद्धा आणि बुवाबाजीवर प्रहार करणारे प्रतीकात्मक पात्र उभे करून ‘दाभोलकरांचे भूत’ या नाटकाने रसिकांना आज अंतर्मुख आणि विचारप्रवृत्त केले. श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे समीर पंडित निर्मित आणि श्याम पेठकर लिखित या नाटकाचा प्रयोग बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केले आहे. मुळातच हा स्फोटक आणि ज्वलंत विषय आहे पण संहितेत लेखकाने हा विषय भान ठेवून संयतपणे हाताळला आहे. त्यात हरीश इथापे या कसबी दिग्दर्शकाने आपले कौशल्य पणाला लावले असल्याने हा प्रयोग रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. विदर्भातील कलावंतांनी घेतलेले परिश्रम आणि प्रयोगाची उंची गाठण्याचा प्रयत्न प्रशंसनीय होता. समाजातील अन्याय, अत्याचार, कर्मकांड व अंधश्रद्धा अस्वस्थ करणारी असली तरी पोलीस खात्यात नोकरी करताना आदेश मानावा लागतो. त्यातच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होते आणि या हत्येच्या तपासाची शेडमाके या पोलीस हवालदारावर येते. या दरम्यान शेडमाके यांच्या गावातील काही कर्मठ लोक रमेश नावाच्या एका निरपराध तरुणाची निर्घृण हत्या करतात. त्याचा दारूने मृत्यू झाला, असा रिपोर्ट तयार करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो. या घटनेने शेडमाके व्यथित होतात आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांच्या भूताने ते झपाटतात. अन्यायाविरुद्ध बोलतात, मीच नरेंद्र दाभोलकर असल्याचे सांगतात. यामुळे दाभोलकरांच्या भूताने ते झपाटलेले आहेत आणि त्यांनी दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची नावे सांगितलीत तर...असे अनेक प्रश्न निर्माण होतात.शेडमाके यांना झपाटलेल्या दाभोलकरांच्या भूताने मारेकऱ्यांची नावे जाहीर केली तर या भीतीने मठाच्या अण्णासाहेबांची झोप उडते. आमदाराच्या मदतीने शेडमाके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो, त्यांच्यातील भूत काढण्याचाही प्रयत्न होतो. पण शेडमाके कुणालाही बधत नाहीत. यातच भूत असते वा नसते याचाही उहापोह आणि त्यातला फोलपणा संवादातून प्रेक्षकांसमोर विचार प्रसृत करीत जातो. शेडमाके ओरडून आपल्या अंगात कोणतेही भूत नसल्याचे वारंवार सांगतो. पण अण्णासाहेब व त्याचे सहकारी त्याला भुताने झपाटल्याचा गवगवा करतात. दरम्यान दाभोलकर समर्थकांच्यावतीने शेडमाके याची एक जाहीर सभा आयोजित केली जाते. परंतु अण्णासाहेब व आमदार पोलिसांवर दबाव टाकून ती सभा रद्द करतात. त्या जाहीर सभेत शेडमाके यांच्या अंगातील भूत दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची नावे सांगेल, अशी सर्वांना भीती असते. त्यामुळे शेडमाके यांना नजरकैद केल्या जाते. पण लोकांच्या दबावामुळे आमदारांना शेडमाके यांना लोकांपुढे आणावे लागते. येथे शेडमाके स्वत: च माझ्या अंगात भूत आहे की नाही, असा प्रश्न थेट अण्णाला विचारतो. अंधश्रद्धा मानत नसल्याचे ढोंग करणाऱ्या अण्णा आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. शेवटी अण्णाला शेडमाकेच्या अंगात भूत नाही हे कबूल करावे लागते. त्यावर शेडमाके मला समाजसमोर बोलण्यापासून कां रोखता, माझ्या विचारांना तुम्ही कां घाबरता, असा प्रश्नांचा भडिमार करतो. समाजातल्या परस्परविरोधी दोन वृत्तीप्रवृत्तींना आमनेसामने उभे करून ही कलाकृती अनेक प्रश्न निर्माण करीत रसिकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडते. यात हवालदार शेडमाके यांची भूमिका राजा भगत यांनी तर त्यांची पत्नी म्हणून मंजुषा भांड, (आमदार) अरविंद बाभळे, (अण्णा) अशोक तत्त्ववादी व (पोलीस इन्स्पेक्टर ) रूपराव कांबडी यांच्यासह राम तांबडी, प्रशांत नेतलवार, अविनाश हलुले, अमित मुळे, अमर इंगळे, सुहास नगराळे, अनिरुद्ध चोतमल, श्वेता क्षीरसागर आणि कार्यकर्त्याचा नेता म्हणून हरीश इथापे यांनी चोख भूमिका केली. पूरक संगीत आणि सूचक नेपथ्य अनुक्रमे सुहास नगराळे आणि विनोद बांगडकर यांनी तर प्रकाशयोजना मिथुन मित्रा यांची होती. एकूणच हा प्रयोग रंगला असला तरी अधिक परिश्रमाची गरज जाणवली. (प्रतिनिधी)