शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विरोधक म्हणाले, कामांचा हिशेब द्या!

By admin | Updated: July 17, 2014 01:11 IST

महापालिकेतील सत्ताधारी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवितात. आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्ती होत नाही. गेल्या पाच वर्षात घोषणा केलेले प्रकल्प अजूनही साकारलेले नाही.

मनपा सभागृहात झळकला लोकमत : सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळलीनागपूर : महापालिकेतील सत्ताधारी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवितात. आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्ती होत नाही. गेल्या पाच वर्षात घोषणा केलेले प्रकल्प अजूनही साकारलेले नाही. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याचा लेखाजोखाच सादर केला, असे सांगत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी महापालिका सभागृहात ‘लोकमत’ झळकविला. लोकमतमध्ये प्रकाशित विषयांवर चर्चा घेण्याची मागणी करीत ठाकरे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे नगरसेवक हातात लोकमत घेऊन महापौरांच्या आसनासमोर आले. भाजप विरोधात नारेबाजी सुरू झाली. या गोंधळाचा फायदा घेत महापौर अनिल सोले यांनी पटापट विषय पुकारून मंजूर केले व सभा गुंडाळली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. एक मिनिटात १४ विषय मंजूरलोकमतने प्रकाशित केलेल्या विषयावर जाब विचारण्यासाठी विरोधक महापौरांच्या आसनासमोर जमले. नारेबाजी सुरू केली. या संधीचा फायदा घेत गणिताचे ‘प्राध्यापक’ राहिलेले महापौर अनिल सोले यांनी पाढे म्हटल्यासारखे पटापट विषय क्रमांक वाचले. एका मिनिटात त्यांनी तब्बल १४ विषय कुठलीही चर्चा न करता मंजूर केले. विषय पत्रिकेवरील जुने प्रश्न निरस्त केल्यामुळे प्रश्नोत्तराच्या वेळेत महापौरांना चर्चा घेता आली असती पण तसे न करता त्यांनी सभा गुंडाळून लोकशाहीचा खून केला, अशी टीका विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली. महापौरांच्या आसनासमोर विरोधकांची घोषणाबाजीसत्ताधाऱ्यांनी न पेलणारी आश्वासने दिली. स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात एकही स्वप्न पूर्णपणे वास्तवात साकारले नाही. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने व त्यावर झालेली कृती याचा परिपाक ‘लोकमत’ने ‘नो उल्लू बनाविंग’ या विशेष पानाद्वारे बुधवारच्या अंकात प्रकाशित केला. विरोधकांनी हाच विषय महापालिका सभागृहात उचलून धरला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी लोकमत झळकवीत अपूर्ण राहिलेल्या घोषणांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणांवर भर दिला. जनतेची दिशाभूल केली. प्रत्यक्षात एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे. लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त चुकीचे आहे का, याचा खुलासा करून या सर्व विषयांवर चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी वृत्तपत्राच्या बातम्यांवर सभागृहात विश्लेषण करता येणार नाही, असे मत मांडले. ठाकरे, गुडधे यांनी दटके यांच्या युक्तिवादाला जोरदार विरोध दर्शविला. सभागृहात चर्चा होणारच नसेल तर सभेला अर्थ काय, असा सवाल गुडधे यांनी केला. लोकमत उंचावत ठाकरे महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल गुडधे हे देखील लोकमत उंचावत आले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस- राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक चर्चेची मागणी करीत समोर आले. महापौर सोले यांनी विरोधकांना प्रश्नकाळ सुरू असल्याचे सांगत जागेवर बसण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही विरोधक नमले नाहीत. विरोधकांनी सत्ताधारी भाजप विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचा फायदा घेत सत्तापक्ष नेते दटके यांनी विषय पत्रिकेला सुरुवात करण्याची सूचना केली. ही संधी साधत महापौरांनी पटापट एकएक विषय पुकारून मंजूर केले व सभा संपल्याची घोषणा केली. लोकमतने मांडलेल्या विषयामुळे १५ मिनिटात सत्ताधाऱ्यांना सभा गुंडाळावी लागली. (प्रतिनिधी)