शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील

By जमीर काझी | Updated: July 16, 2021 07:07 IST

ACB कडून परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून खुल्या चौकशीला सुरुवात. गृह विभागाकडून प्रस्तावाला मान्यता.

ठळक मुद्देACB कडून परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून खुल्या चौकशीला सुरुवात.गृह विभागाकडून प्रस्तावाला मान्यता.

जमीर काझी

मुंबई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून खुल्या चौकशीला (ओपन इन्क्वायरी) सुरुवात केली आहे. गृह विभागाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

निरीक्षक अनुप डांगे, निरीक्षक भीमराव घाडगे व क्रिकेटबुकी सोनू जलान यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपावरून एसीबीने गोपनीय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सरकारकडे पाठविला होता. त्याच्या आधारावर ही चौकशी केली जाणार आहे. होमगार्डचे महासमादेशक असलेले परमबीर सिंग गेल्या अडीच महिन्यांपासून आजारपणाच्या रजेवर आहेत. राज्याबाहेर असल्याने त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी प्रलंबित आहे. आता त्यांच्यामागे एसीबीच्या चौकशीची भर पडली आहे.

परमबीर सिंग हे ठाण्यात आयुक्त असताना त्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले, त्यातून सोडण्यासाठी पैशांची मागणी केली अशी तक्रार भीमराव घाडगे यांनी केली होती. क्रिकेट बुकी सोनू जलानने परमबीर सिंग, तत्कालीन निरीक्षक प्रदीप शर्मा, राजेंद्र कोथमिरे यांनी तीन कोटी खंडणी घेतल्याचा आरोप केला आहे, तर परमबीर सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात गोवून निलंबन केले आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी कोट्यवधींची मागणी केली होती, असा आरोप करून कारवाई करण्याची मागणी निरीक्षक अनुप डांगे यांनी केली होती. त्यावर राज्य सरकारने याची गोपनीय चौकशी करण्याचे आदेश एसीबीला दिले होते. यात तथ्य आढल्याने गेल्या महिन्यात उघड चौकशी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.

..अशी होणार चौकशीएसीबीकडून परमबीर सिंग, त्यांचे कुटुंबीयांचे गेल्या ५ किंवा १० वर्षांतील वार्षिक उत्पन्न, त्याचे आयकर परतावे, प्रत्यक्षात जमवलेली जंगम व स्थावर मालमत्ता, विविध ठिकाणची गुंतवणूक याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल. त्याबाबत परमबीर व त्यांचे कुटुंबीयांकडून जबाब घेतला जाईल. त्यानंतर प्राप्त मालमत्ता उत्पन्नाच्या स्त्रोताहून अधिक असल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्र