शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा: खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांच्या बढत्या पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

By यदू जोशी | Updated: December 30, 2017 09:30 IST

मुंबई : खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मागास प्रवर्गांच्या बढत्यांतील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावरील स्थगिती कायम ठेवली आहे.

मुंबई : खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मागास प्रवर्गांच्या बढत्यांतील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावरील स्थगिती कायम ठेवली आहे.मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय आघाडी सरकारने २५ मे २००४ रोजी घेतला होता. ४ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवताना आपल्याच (पान १० वर)(पान १ वरून) निकालास १२ आठवड्यांची स्थगिती दिली होती. त्या दरम्यान, राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. कोणत्याही प्रवर्गात बढतीत आरक्षण देऊ नये, असे आदेश राज्य शासनाने २ नोव्हेंबर २०१७ रोजी काढले.मूळ प्रकरण हे मागास प्रवर्गांना बढतीत आरक्षण द्यावे की देऊ नये याच्याशी संबंधित असताना खुल्या प्रवर्गांच्या बढत्यांना स्थगिती देण्याच्या शासनाच्या भूमिकेवर टीका झाली होती. काही संघटनांनी शासनाकडे तशी निवेदनेदेखील दिली होती. विविध प्रशासकीयविभागांनीदेखील तशी विनंती केलेली होती.अखेर या बाबत विधी व न्याय विभागाचे मत सामान्य प्रशासन विभागाने मागविले. खुल्या प्रवर्गांतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बढत्या सुरू ठेवण्यात कुठलीही वैधानिक अडचण नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, बढतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधिन राहून भरण्याचे आदेश आज काढण्यात आले.>खुल्या प्रवर्गासाठी बढतीत आरक्षणपुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने६ डिसेंबरच्या अंकात दिले होते.>मागास प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाºयांना पदोन्नती देताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत २५ मे २००४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. त्या व्यतिरिक्त नियमित पदोन्नती त्यांना लागू असेल.मागास प्रवर्गांबरोबरच खुल्या प्रवर्गासाठी बढत्या राज्य शासनाने स्थगित केल्याने खुल्या प्रवर्गातील हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचाºयांच्या बढत्या अडल्या होत्या. त्यांना बढत्या मिळण्याचा मार्ग आजच्या शासन निर्णयाने मोकळा झाला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय