शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग थांबला, तरच निर्बंध होणार शिथिल; टास्क फोर्सची माहिती, परिस्थिती पाहून निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:32 IST

कोविडखेरीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, मात्र पुढील १० ते १५ दिवसात यात शिथिलता आणली जाईल. यात प्रत्येक वैद्यकीय, आरोग्यसेवेच्या संस्थेचे नियम याविषयी वेगळे असतात. त्या अनुषंगाने या चाचण्यांविषयी अंतिम निर्णय घेतला जातो.

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही कोरोना संसर्गाची स्थिती पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे आता लगचेच मास्कमुक्ती वा पूर्ण निर्बंध काढून टाकण्याच्या चर्चेला अल्पविराम द्यायला हवा, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली आहे. कोरोना नियंत्रणानंतर भविष्यात सर्व बाबतीत संसर्गाची स्थिती अभ्यासून राज्य शासनाकडे निर्बंध शिथिलतेची शिफारस कऱण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.कोविडखेरीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, मात्र पुढील १० ते १५ दिवसात यात शिथिलता आणली जाईल. यात प्रत्येक वैद्यकीय, आरोग्यसेवेच्या संस्थेचे नियम याविषयी वेगळे असतात. त्या अनुषंगाने या चाचण्यांविषयी अंतिम निर्णय घेतला जातो. भविष्यात नवीन म्युटंट न आल्यास सार्वजनिक सोहळे, हाॅटेल, पर्यटन यावरचे निर्बंध काढण्यात येतील. मे-जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणाची स्थिती अधिक सुधारली असेल, त्यानंतर लवकरच एन्डेमिक प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश  सुपे यांनी दिली आहे. भविष्यात कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी होईल. याचा अर्थ बहुतांश लोक हे गंभीर आजारी पडणार नाहीत, जुने किंवा नवे व्हेरिएंट एकत्र आले तरी आपल्यापैकी बहुतांश जणांना सामान्य कोरोना विषाणूसारखी सर्दी होईल, नाक चोंदणं किंवा डोकेदुखीसारखा त्रास होईल आणि काही काळाने बरे व्हाल, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.

जगभरात कोरोना एखाद्या उद्रेकासारखा आढळला म्हणून आपण त्याला जगभर पसरलेली महासाथ (पॅन्डेमिक) म्हणत आहोत. हा आजार एन्डेमिक होणे म्हणजे तो आपल्या वातावरणाचा नियमित भाग होणे आणि त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार तो कमी प्रमाणात पण नियमित आढळत राहणे. जसे फ्लूसारखे आजार हिवाळा, पावसाळा या वातावरणात काही प्रमाणात वाढतात. क्वचित प्रसंगी स्थानिक उद्रेक होणे, याला एन्डेमिक होणे म्हणतात. हिवताप, क्षय, एचआयव्ही यासारखे आजार एन्डेमिक आहेत, हे आपण याच अर्थाने म्हणतो.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई