शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:19 IST

Sanjay Gaikwad Condition to Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

Sanjay Gaikwad Condition to Rahul Gandhi:काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील आरक्षण संपवण्यासंदर्भात विधान केले. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राहुल गांधींवर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले. यानंतर आता संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर एक अट ठेवली आहे. 

प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे.  काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मत मागितले. आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला ११ लाख रुपये देणार. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात एससी, एसटी, ओबीसी यांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी आरक्षण दिले. काँग्रेसचे नेते विदेशात जाऊन माझ्या देशातले रिझर्व्हेशन संपवायचे आहे, असे वक्तव्य केले. पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखविली. लोकसभेला फेक नरेटिव्ह ठेवून लोकांची मते घेतली, या शब्दांत संजय गायकवाड यांनी टीका केली होती. 

...तरच मी माझे शब्द मागे घेईन

मीडियाशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे. संपूर्ण देशाच्या पीडित समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन तिथे माथा टेकावा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमिवर माथा टेकावा. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी. राहुल गांधी यांनी तसे केले तर जी घोषणा केली आहे की, त्याबाबत माझे शब्द मी मागे घेईन, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधींबाबत भाजप नेत्यांनी वापरलेल्या भाषेवरुन सर्व राज्य काँग्रेसला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात निदर्शने करण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना