शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकभरतीचे नुसतेच वेळापत्रक, पाेर्टलचा मात्र अजूनही पत्ताच नाही!

By संदीप वानखेडे | Updated: August 21, 2023 12:24 IST

१५ ऑगस्टपासून पाेर्टल हाेणार हाेते सुरू : बिंदुनामावलीचा घाेळ सुरूच

संदीप वानखडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा: राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.  पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती हाेणार असून, १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेणार असल्याची घाेषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केली हाेती. त्यांनी वेळापत्रकही जाहीर केले हाेते; मात्र अजूनही पाेर्टल सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे.  तसेच, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या बिंदुनामावलीचा घाेळ सुरूच आहे.  सन २०१७ पासून शासनाने शिक्षकांची पदे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे.  पाच वर्षांनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर हाेऊन पाच महिने लाेटले तरी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यातच शिक्षक भरती दाेन टप्प्यांत करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे.  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री केसरकर यांनी शिक्षकभरतीचे वेळापत्रक जाहीर केले हाेते. त्यानुसार १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेईल, असे त्यांनी सांगितले हाेते;  मात्र २० ऑगस्ट उलटल्यानंतरही पाेर्टलला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. 

पाच वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेलीच 

  • पवित्र पाेर्टलवर शासनाने २०१७ मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया २०२३ मध्येही पूर्ण झाली नाही. 
  • १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी सुरू असलेल्या मुलाखतींकडे अनेक उमेदवार पाठ फिरवत आहेत.  
  • पाच वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी दुसरी नाेकरी स्वीकारली आहे.  त्यानंतर आता त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. 
  • त्यातही मिळालेल्या शाळा लांबच्या असल्यानेही उमेदवार मुलाखतीसाठी येत नसल्याचे चित्र आहे.

नाेंदणीही सुरू हाेईना

पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणीही सुरू झाली नाही. जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पाेर्टलवर नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी १० ते १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने शासनाने पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे़. 

... असे हाेते वेळापत्रक

  • पवित्र पाेर्टलवर जाहिरात अपलाेड करणे : १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
  • उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा : १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर
  • निवड यादी प्रसिद्ध : १० ऑक्टाेबर
  • मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी : ११ ऑक्टाेबर ते २० ऑक्टाेबर
  • पदस्थापनेसाठी समुपदेशन : २१ ऑक्टाेबर ते २४ ऑक्टाेबर
टॅग्स :Teacherशिक्षक