शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ देणार, योजनेत सुधारणा करणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:02 IST

विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. घोषणेनुसार पैसे दिले जातील. लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

मुंबई : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे, त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल. योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्यावेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले.

राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे. दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील. अद्यापही ५ वर्षांचा कालावधी आहे. ही योजना आम्ही बंद करणार नाही. मात्र, ही योजना गरीब घटकांतील महिलांकरता आहे. ती केवळ आर्थिक साहाय्यासाठी न ठेवता, यातून महिलांचे सबलीकरण केले जाईल. या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पाहत आहोत, असेही पवार यांनी सांगितले. 

नवी दिल्लीत  सांस्कृतिक भवन सांगली येथे क्रांतीसिंह नानासिंह पाटील यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. तर नवी दिल्लीत मराठी भाषकांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणाही यावेळी पवार यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के दराने कृषी कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वंचितांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

राष्ट्रविकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असेल येत्या ५ वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजहिताच्या योजना लागेल ती मूल्ये देऊनही बंद केल्या जाणार नाहीत. महसुली तूट भरून काढण्यासाठी उत्पन्नात वाढ आणि अनुत्पादक खर्चात कपात करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.

जनतेला अधिक त्रास न देता कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कराच्या प्रक्रियेत आणू. महसुली तूट न्यून करण्यासाठी कठोर उपाययोजना करत आहोत. देशात केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या तीन राज्यांचीच कर्जाची आकडेवारी २० टक्क्याच्या आत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचे जे ध्येय निश्चित केलेले आहे, त्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे असेल.

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अर्थसंकल्पाचा उपयोग होईल. केवळ एका वर्षाचा नव्हे, तर वर्ष २०२९ चा विचार करून राज्याचा  अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. विखेंचे वाळू धोरण गुंडाळलेराज्य सरकारचे नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसात जाहीर करण्यात येणार असून नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली. यामुळे यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केलेले वाळू धोरण गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAjit Pawarअजित पवारWomenमहिला