जितेंद्र कालेकर
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २० - उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने ठाण्यात एका इसमाचा खून करण्यात आला, मात्र तब्बल अडीच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला. उसनवारीचे पाचशे रुपये परत न केल्याने कृपाशंकर रामसागर पाठक (24, रा. कळवा, मुळ रा. उत्तरप्रदेश) या फिरस्त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून खून करणा:या लंबू उर्फ रप्पल उर्फ स्वामीदयाल जयकरण वर्मा याला उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून ठाण गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याला 24 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
कळव्याच्या ठाकूर पाडयात बिगारी काम करणारा फिरस्ता कृपाशंकर याचा खून केल्याची घटना 26 मे 2016 रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक समांतर तपास करीत होते. एक कोटींच्या खंडणीप्रकरणी खालीद कादरी (49) या मुंब्य्रातील इस्टेट एजंटचे अपहरण केल्यानंतर त्याची ठाणो गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 1 आणिि मुंब्रा पोलिसांच्या पथकाने थेट पाटणा येथून सुटका करुन तिघा खंडणीबहाद्दरांना अटक केली. त्यानंतर खलिद आणि खंडणीबहाद्दर नूर आलम यांचा मोबाईल शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील चंपारण्य जिल्ह्यात गेले होते. त्यांनी दंडक नदीच्या पाटातून दोन मोबाईलही हस्तगत केले.
16 ऑगस्ट रोजी बिहार ते गोरखपूर येथे हे पथक आले. गोरखपूर ते मुंबईसाठी रेल्वेने येतांना रस्त्यातच झाशी स्थानकाजवळ आल्यानंतर पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना कृपाशंकरचा मारेकरी लंबू वर्मा हा गाेंडा जिल्ह्यात येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागूल आणि हवालदार भिलारे हे दोघे झाशीमध्ये उतरले. त्यांनी गौडा जिल्हयातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वर्माचा शोध घेतला. तो त्याच्या मेव्हण्याच्या अंदूपूर, शिसपूर गावातील मिळाला. त्याच्याकडे कळव्यातील कृपाशंकरच्या खूनाची कसून चौकशी करण्यात आली. कृपाशंकरने पाच वेळा प्रत्येकी शंभर रुपये असे पाचशे रुपये घेतले होते. ते परत मागितल्यानंतर त्याने शिवीगाळी केली. याच कारणावरुन 26 मे रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास तो कळव्याच्या ठाकूरपाडा येथील कालीका मंदीराजवळ झोपलेला असतांना त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार केले. त्यातच त्याचा मृत्यु झाल्याची कबूलीही त्याने दिली. त्याला 17 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणो न्यायालयात शुक्रवारी हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)