शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील केवळ ३० टक्के रेस्टॉरंट, बार झाले सुरू; पहिल्या दिवशी ५०% ग्राहकांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:42 IST

राज्यात इतर जिल्ह्यांत ५० टक्के आसन क्षमतेसह तर मुंबईत ३३ टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू केले जातील.

मुंबई : सोमवारपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यात आले. पण कर्मचारी कमी असल्याने अनेक रेस्टॉरंट सुरू झाले नाही. केवळ ३० टक्के रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी ३५ ते ४० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती ‘आहार’ने दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यात इतर जिल्ह्यांत ५० टक्के आसन क्षमतेसह तर मुंबईत ३३ टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू केले जातील.याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, ग्राहकांनी आज जो प्रतिसाद दिला तसेच सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीचे पालन करीत असताना ग्राहक अत्यंत संयमाने सामोरे गेले. नियमावली केवळ ग्राहकांसाठीच नाही, कर्मचाऱ्यांसाठीही हितकारक आहे. अपेक्षेप्रमाणे आज ३० ते ३५ टक्के रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. यापैकी कित्येक ठिकाणी तर ३० ते ४० टक्के कर्मचारी उपलब्ध आहेत. पहिल्या दिवशी ५० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे.अपुºया मनुष्यबळामुळे मेन्यूची संख्या कमी केली आहे. रेस्टॉरंट आणि बारची वेळही कमी केली आहे. पण येत्या १५ दिवसांत सर्व पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. रेस्टॉरंट चालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.पार्सलमध्ये २५ टक्के घटकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे खाद्यपदार्थ केवळ पार्सल देण्यात येत होते. पण सोमवारी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बसून जेवता येत आहे. त्यामुळे जेवण पार्सल नेण्याच्या प्रमाणात २५ टक्के घट झाली, अशी माहिती आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.रात्री दीड वाजेपर्यंत राहणार खुलेसोमवारपासून रेस्टॉरंट आणि बार रात्री १.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. रात्री १२.३० वाजेपर्यंतच खाद्यपदार्थ आणि मद्यपानासाठी शेवटची ऑर्डर करता येणार आहे, अशी माहिती ‘आहार’ने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या