ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १९ : रिसोड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला असतानाही प्रकल्पांमध्ये मात्र समाधानकारक वाढ नसल्याचे दिसून येते. १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यातील १७ प्रकल्पांत केवळ २५.७६ टक्के जलसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या दप्तरी आहे.
रिसोड तालुक्यात १ जून ते १८ आॅगस्ट या दरम्यान एकूण ६७९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. एकूण सरासरीच्या हा पाऊस ३९ टक्के अधिक आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९०.९५ अशी आहे. तालुक्यात समाधानकारक पाऊस असताना, दुसरीकडे प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे.
यावरून प्रकल्प परिसरात दमदार पाऊस नसल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहेत. नेतंसा प्रकल्पात ४६.६१, बोरखेडी ७.३५, कोयाळी २०.३८, धोडप २१.२१, गणेशपुर ९२.८६, गौंढाळा ४२.५६, हराळ १५.२५, जवळा ६५.१४, करडा ४८.७५, कोयाळी २८.९२, मांडवा ४३.०७, मोरगव्हान २०.५२, पाचंबा ६९.०८, वाघी २९.२३, वरुड बॅरेज १००, वाडी रायताड ५१.७७, कुकसा (सं.) ७८.९० असा जलसाठा आहे.