शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

परदेशी उत्पादनांची आॅनलाइन खरेदी रडारवर

By admin | Updated: August 14, 2015 02:25 IST

स्मार्ट फोन, टॅबलेटवर डाऊनलोड होणारी परदेशी अ‍ॅप्स आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणारी परदेशी उत्पादनांची खरेदी किंवा परदेशी लेखकाची ई-बुक यांच्या व्यवहारांकडे

मनोज गडनीस, मुंबईस्मार्ट फोन, टॅबलेटवर डाऊनलोड होणारी परदेशी अ‍ॅप्स आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणारी परदेशी उत्पादनांची खरेदी किंवा परदेशी लेखकाची ई-बुक यांच्या व्यवहारांकडे प्राप्तिकर विभागाने आता मोर्चा वळविला आहे. हे व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला त्याची नोंद ठेवावी लागणार असून, चालू आर्थिक वर्षासाठीचे प्राप्तिकराचे विवरण भरताना त्यात या सर्वाची नोंद करावी लागणार आहे. ही गोष्ट वरकरणी जरी अजब वाटत असली तरी, अशा पद्धतीनेच या व्यवहाराची पडताळणी करण्याची सूचना केंद्रीय वित्तखात्याने जारी केली आहे. असे न केल्यास तुम्हाला एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो! प्राप्तिकर विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कायदा कलम ‘१९५(६)’ आणि ‘३७बीबी’मध्ये सुधारणा करण्यात आली असून, परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या व्यवहारांची नोंद ही विवरणातील ‘१५ सीए’ आणि ‘१५ सीबी’ या फॉर्म्समध्ये करावी लागेल. अशाच आशयाचे कलम आतापर्यंत कार्यान्वित होते. परंतु, त्याची किमान मर्यादा ही एकावेळी ५० हजार रुपये किंवा त्यावरील खरेदीसाठी किंवा वर्षाकाठी अडीच लाख रुपये किंवा त्यावरील व्यवहार याकरिता लागू होती. मात्र, आता ही मर्यादा हटविण्यात आली आणि परदेशी कंपन्यांसोबत होणाऱ्या लहानमोठ्या व्यवहारांनाही लागू करण्यात आली. यामधून वैद्यकीय मदत, देणग्या, भेटवस्तू पाठविणे अशा घटकांना वगळण्यात आले आहे. स्मार्ट फोन अथवा टॅब्लेटच्या माध्यमातून अनेक लोक विविध अ‍ॅप्स डाऊनलोड करत असतात. अ‍ॅप विकसित करणाऱ्या कंपन्या या परदेशी आहेत किंवा नाही याची तपासणी प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. त्यामुळे असे डाऊनलोडिंग करताना अधिक सतर्कता बाळगावी लागेल. अ‍ॅपल कंपनीच्या ग्राहकांना बसेल सर्वाधिक फटकाया निर्णयाचा सर्वाधिक फटका हा अ‍ॅपल कंपनीच्या ग्राहकांना बसेल. कारण, अ‍ॅपलच्या ग्राहकांना सर्वच अ‍ॅप्स ही अ‍ॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करावी लागतात. एखादे हिंदी गाणे जरी डाऊनलोड करायचे असले तरी ते आयट्यूनवरूनच खरेदी करावे लागते. परंतु ती कंपनी परदेशी असल्याने या गाण्याच्या खरेदीच्या निमित्ताने झालेल्या व्यवहारांची नोंद ग्राहकाला ठेवावी लागेल व त्याची नोंदणी प्राप्तिकराच्या विवरणात करावी लागेल.