शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोलीभाषांच्या जतनासाठी आता ऑनलाइन संग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:46 IST

दोन दिवसांत ५०० हून अधिक शब्द संग्रही; सर्वसामान्यांनाही सहभाग घेणे शक्य, विनामूल्य शब्दकोश होणार ऑनलाइन

- स्नेहा मोरे मुंबई : गेल्या काही वर्षांत सर्व स्तरांतून बोलीभाषांचे वैभव लयाला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. झपाट्याने फोफावत चाललेल्या इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीत आपण भाषेला दुय्यम स्थान देत आहोत. मात्र आता हेच वैभव जतन करण्याची किंबहुना वाढविण्याची संधी मिळणार आहे. ई-बुक्ससाठी प्रसिद्ध ब्रोनॅटो या संस्थेने बोलीभाषांच्या ऑनलाइन संग्रहाच्या उपक्रमाची सुरुवात केली. अवघ्या दोन दिवसांत ५०० हून अधिक शब्दांचा संग्रह झाला. बोलीभाषांच्या शब्दकोशासाठी सर्वसामान्यही सहभाग घेऊ शकणार आहेत.बोलीभाषांच्या ऑनलाइन शब्दकोशासाठी ब्रोनॅटोने गुगल फॉर्म तयार केला असून हा सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध आहे. या फॉर्ममध्ये कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, वऱ्हाडी, सामवेदी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, खाल्ल्यान्गी, नंदुरबारी, वर्ल्यांगी, डोंगरांगी, जामनेरी, खान्देशी/ अहिराणी, गोंड, भिल्ल, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया व अन्य भाषांचे पर्याय दिले आहेत. या भाषांमधील एका भाषेची निवड करून बोलीभाषेतील शब्द व त्यांचे अर्थ यात समाविष्ट करायचे आहेत. शिवाय, यात बोलीभाषांतील म्हणीही नोंद करता येऊ शकतात.ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून बोलीभाषांचा अभ्यास करत होतो, त्यासंदर्भात कथा स्पर्धाही घेतली. हा अभ्यास करताना बोलीभाषेतील साहित्य खूप आहे, मात्र त्यांचे संदर्भ आढळले नाहीत. आताच्या पिढीला काहीसे बोलीभाषेतील शब्द माहिती असतील, परंतु त्यानंतरच्या पिढीला तर याबाबत फारच तुरळक माहिती असेल. याच विचारातून बोलीभाषांचे संकलन, संवर्धन आणि साहित्यनिर्मिती प्रकल्प सुरू करायचा निर्णय घेतला. मराठीतून हा प्रकल्प सुरू केला, त्याला दोन दिवसांत अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. माहिती संकलित झाल्यानंतर सर्वांसाठी विनामूल्य हे शब्दकोश आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील.तुमचे नावही झळकणारसोशल मीडियावर सर्फिंग करण्यात आपण बराच वेळ खर्च करतो, त्यातला काही वाटा या प्रकल्पालाही देण्यात यावा याकरिता ब्रोनॅटोने या प्रकल्पाला अनोख्या संकल्पनेची जोड दिली आहे. त्यात या बोलीभाषांच्या प्रकल्पासाठी तुम्ही नोंदणी केलेले शब्द व त्यांचे अर्थ सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर शेअरही केले जातील. या माध्यमातून सर्वांनी प्रेरणा घेऊन बोलीभाषांच्या प्रकल्पासाठी योगदान द्यावे, हा यामागचा हेतू आहे.लवकरच कोकणी भाषेचाही संग्रहमराठीच्या आॅनलाइन शब्दकोशाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, त्यात बरेच जण आता अन्य भाषांसाठी विचारत आहेत. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता कोकणी भाषेची निवड करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कोकणी भाषा संग्रहासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. बोलीभाषा समृद्ध होण्यासाठी मदत करणे, हा यामागचा उद्देश आहे.‘आपल्याच मातीत होतेय भाषेची गळचेपी’इंटरनेटच्या विश्वात भाषा सहज, सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. मात्र मराठी भाषेत तसे काम झाले नसल्यामुळे आपल्याच मातीत भाषेची गळचेपी होते आहे. त्यात शासन दरबारीही भाषेला न्याय मिळत नसल्याने आता आपण मातृभाषा जगविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी सांगितले.