नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याला शनिवारी सर्वाधिक २,७७५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. कमीत कमी भाव १,१०५ तर सरासरी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला.पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २,६६७ रुपये भाव जाहीर झाला. सरासरी भाव २,२५१ रुपये होता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा व धान्य लिलाव तीन दिवस बंद राहाणार आहेत. शुक्रवारी कांद्याला किमान ८००, कमाल २४०० भाव मिळाला होता.धुळ््यात ९ हजार क्विंटल खरेदीपिंपळनेर (जि. धुळे) येथील उपबाजार समितीत शनिवारी शेतकºयांनी सुमारे ३५० वाहनांमधून कांदा विक्रीसाठी आणला होता. दिवसभरात तब्बल ९ हजार क्विंटल कांद्याची सरासरी २६०० रुपये दराने खरेदी झाली. २३ जुलैनंतर दरात अचानक वाढ होऊन, प्रती क्विंटल २,६५५ रुपये भावाचा उच्चांक गाठला गेला होता.सोलापूरला व्यापाºयाची ३५ लाखांची फसवणूकतामिळनाडूच्या चार व्यापाºयांविरुद्ध सोलापूरच्या कांदा व्यापाºयास ३५ लाखांना फसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नागनाथ धर्माण्णा जावळे यांचा विश्वास संपादन करून, वेळोवेळी त्यांनी ३५ लाख रुपयांच्या कांद्याची खरेदी केली होती.
नाशिकमध्ये कांद्याला २,७७५ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:59 IST